कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा? शासनाच्या निर्णयाने ३,२७६ कर्मचाऱ्यांना दिलासा
मुंबई : Contract Employees Maharashtra : महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा पूर्ण केलेल्या ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतनश्रेणीतील पदांवर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

या कर्मचाऱ्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. Contract Employees Maharashtra
मात्र, बाह्य संस्थांमार्फत नियुक्त केलेल्या काही कर्मचाऱ्यांना या निर्णयातून वगळण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याचे चित्र आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







