एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर ३ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक, होणाऱ्या आंदोलनावर तोडगा निघणार? 

संघटनांच्या आंदोलनाच्या नोटिशीनंतर महामंडळ प्रशासन ॲक्शन मोडवर

मुंबई : Msrtc Strike Update : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनांकडून आंदोलनाची नोटीस देण्यात आल्यानंतर महामंडळ प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महामंडळाचे महाव्यवस्थापक (क. व औ. सं.) यांनी यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांच्या अध्यक्ष व सरचिटणीसांना पत्र पाठवून बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, एसटी संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनांनी विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनाची नोटीस दिली आहे. या नोटिशींच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. Msrtc Strike Update

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि संघटनांमध्ये होणाऱ्या या चर्चेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, बैठकीतून मागण्यांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक निर्णय होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

1 thought on “एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर ३ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण बैठक, होणाऱ्या आंदोलनावर तोडगा निघणार? ”

Leave a Comment