तीन महिन्यांच्या अतिरिक्त प्रसूती रजेबाबत मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत कारवाई स्थगित.
मुंबई : Maternity Leave Rules India महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (MSRTC) महिला चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची प्रशासकीय अपडेट समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या अतिरिक्त प्रसूती रजेसंदर्भात महामंडळाने नवीन परिपत्रक जारी केले आहे.
📌 नेमका निर्णय काय?
महामंडळाच्या कर्मचारीवर्ग शाखेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महिला वाहक कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेला जोडून तीन महिन्यांची अतिरिक्त प्रसूती रजा मंजूर करण्याबाबत यापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरच्या परिपत्रकानुसार महिला चालक तसेच वाहक कर्मचाऱ्यांनाही तीन महिन्यांची अतिरिक्त खास रजा देय करण्यात आली होती.
मात्र, या रजेच्या संदर्भात आता महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
📄 पुढील आदेशापर्यंत कारवाई स्थगित. Maternity Leave Rules India
संबंधित परिपत्रकात नमूद केल्यानुसार, महिला चालक आणि वाहक कर्मचाऱ्यांच्या प्रसूती रजेला जोडून मंजूर करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या खास प्रसूती रजेची त्यांच्या खात्यातून जमा होणाऱ्या सरासरी वेतनावरून रजेनुसार समायोजन (वळती) करण्याची कार्यवाही पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकातील सूचना आणि आपल्या कार्यालयाकडून मिळणाऱ्या पुढील आदेशांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
⚠️ महत्त्वाची सूचना : या परिपत्रकात तीन महिन्यांच्या अतिरिक्त प्रसूती रजेच्या समायोजनाची कार्यवाही स्थगित केल्याचे नमूद आहे. याचा अर्थ ही रजा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे, असा होत नाही. Maternity Leave Rules India

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







