नाशिक : Employee Retirement Benefits : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांवरून सरकारी कर्मचारी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
श्रीनगर येथे झालेल्या अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना, नवीन पेन्शन योजना आणि युनिफाइड पेन्शन स्कीमसह कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच आठवा वेतन आयोग तातडीने स्थापन करावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे. वेतन, पेन्शन आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
या मागण्यांसाठी १२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. Employee Retirement Benefits

दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील कर्मचारी संघटनांना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता दिल्लीतील प्रस्तावित आंदोलनासाठी राज्यातील कर्मचारी संघटना किती मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, याकडे लक्ष लागले आहे.
जुनी पेन्शन योजना आणि आठवा वेतन आयोग या दोन प्रमुख मागण्यांमुळे आगामी काळात कर्मचारी संघटनांच्या आंदोलनाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







