मुंबई : Government Employees Pension : निवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पेन्शनसह निवृत्तीचे आर्थिक लाभ वेळेत मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने संबंधित कार्यालयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
निवृत्तीवेतनाची प्रकरणे कार्यालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे निवृत्तीवेतना ची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर शासनाने भर दिला आहे.
सेवापुस्तक अद्ययावत ठेवणे बंधनकारक
कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक नियमितपणे अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियुक्ती, वेतन, पदोन्नती, वेतनवाढ, रजा, नामनिर्देशन तसेच कुटुंबीयांची माहिती यासह आवश्यक नोंदी व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहणार आहे.
निवृत्तीच्या दोन वर्षे आधीपासून प्रक्रिया
निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकाची वेतन पडताळणी निवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्षे आधी सुरू करून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही विशेष प्रकरणांना प्राधान्य देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास 15 दिवसांत पूर्तता. Government Employees Pension
पेन्शन प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती वेळेत जमा करणे आवश्यक आहे. महालेखापाल कार्यालयाकडून काही त्रुटी किंवा आक्षेप नोंदवले गेल्यास त्यांची पूर्तता 15 दिवसांच्या आत करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत.
विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता
पेन्शन प्रकरणात अनावश्यक विलंब होऊन शासनावर व्याजाचा आर्थिक भार पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये शिस्तभंगाची कारवाई तसेच गोपनीय अहवालात नोंद करण्याची तरतूद असल्याचे या सूचनांमध्ये नमूद आहे.
पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे? Government Employees Pension
निवृत्तीपूर्वीच सेवापुस्तकातील नोंदी तपासणे, बँक खाते व नामनिर्देशनाची माहिती अचूक देणे आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये नावाची तफावत राहणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, अंशराशीकरण आणि उपदानाचे लाभ वेळेत मिळावेत, यासाठी संबंधित कार्यालयांनी प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करण्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .







