नवी दिल्ली : EPFO Advance Withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF मध्ये जमा असलेली रक्कम निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, नोकरीच्या काळात अचानक आर्थिक गरज निर्माण झाल्यास PF मधून ठरावीक अटींवर आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना आहे. आता EPFO ने या आंशिक पैसे काढण्याच्या नियमांची रचना अधिक सोपी केली आहे.
EPFO ने आंशिक PF withdrawal साठी असलेल्या अनेक तरतुदींचे एकत्रीकरण करून त्या तीन प्रमुख श्रेणींमध्ये आणल्या आहेत. यामध्ये आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती यांचा समावेश आहे. त्यामुळे आजारपण, शिक्षण, विवाह तसेच घर खरेदी किंवा बांधकामासाठी PF मधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली आहे.
आजारपणासाठी PF मधून पैसे काढता येणार. EPFO Advance Withdrawal
कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी PF मधून आगाऊ रक्कम काढता येते. या प्रकारच्या गरजेला आवश्यक गरजांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी अचानक पैशांची गरज भासल्यास PF हा आर्थिक आधार ठरू शकतो.
शिक्षणासाठी किती वेळा पैसे काढता येतील?
मुलांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी PF advance घेण्याची सुविधा आहे. नव्या नियमांनुसार शिक्षणासाठी PF मधून कमाल १० वेळा पैसे काढता येऊ शकतात. यामुळे शिक्षणाचा खर्च भागवताना कर्मचाऱ्यांना मोठी मदत होऊ शकते.
विवाहासाठीही PF advance ची सुविधा
कर्मचारी स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या विवाहासाठी PF मधून आगाऊ रक्कम घेऊ शकतो. नव्या व्यवस्थेत विवाहासाठी पैसे काढण्याची मर्यादा ५ वेळा करण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षण आणि विवाहासाठी मिळून एकूण तीन partial withdrawals ची मर्यादा होती.
घरासाठी PF मधून पैसे काढणे सोपे
घर खरेदी, घर बांधणे, घराशी संबंधित काही कामे किंवा गृहकर्जाची परतफेड अशा कारणांसाठीही PF advance घेता येतो. या सर्व बाबी आता ‘Housing Needs’ या स्वतंत्र श्रेणीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
१२ महिन्यांची सेवा महत्त्वाची
नव्या व्यवस्थेत सर्व प्रकारच्या partial withdrawals साठी किमान सदस्यत्व कालावधी १२ महिने ठेवण्यात आला आहे. म्हणजेच संबंधित अटी पूर्ण करणाऱ्या सदस्याला १२ महिन्यांचे सदस्यत्व पूर्ण झाल्यानंतर या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.
PF मधील संपूर्ण रक्कम काढता येते का?
येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. नव्या नियमांनुसार पात्र सदस्याला PF मधील ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम निवृत्तीच्या काळासाठी बचत म्हणून राहावी, हा यामागचा उद्देश आहे.
EPFO ने PF advance ची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न केला असून, कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी त्यांच्या PF बचतीचा वापर करता यावा आणि त्याचवेळी निवृत्तीसाठी काही रक्कम सुरक्षित राहावी, यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्यामुळे PF खात्यात पैसे जमा असलेल्या कर्मचाऱ्यांनी आजारपण, शिक्षण, विवाह किंवा घराशी संबंधित आर्थिक गरज निर्माण झाल्यास आपल्या पात्रतेनुसार PF advance च्या सुविधेचा लाभ घेता येतो

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .








