Close Visit MahaNews12

पदोन्नती संदर्भात शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय – नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य. Government Circular Promotion Rules

पदोन्नती संदर्भात शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय – नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य. Government Circular Promotion Rules

Government Circular Promotion Rules :  दि.15 एप्रिल 2026 : रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत पदोन्नती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या निर्णयामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदोन्नती प्रक्रियेसंबंधित नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर परिपत्रकानुसार, विभागाच्या अधिनस्त सर्व कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाने दि.12 सप्टेंबर 2016 व दि.01 ऑगस्ट 2019 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयांमधील सूचनांचे अवलोकन करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या नवीन निर्देशांनुसार, जर एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने पदोन्नती नाकारायची असल्यास, त्यांनी पदोन्नतीच्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच निर्णय घ्यावा लागणार आहे. अशा परिस्थितीत, दि.12.09.2016 च्या शासन निर्णयानुसार संबंधित अधिकाऱ्याचे नाव नियमित निवडसूची किंवा तदर्थ निवडसूचीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल. Government Circular Promotion Rules

विशेष म्हणजे, एकदा पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पदोन्नती नाकारता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या विचार क्षेत्रात असलेल्या अधिकाऱ्यांनी पदोन्नतीपूर्वीच आपला निर्णय शासन किंवा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नंतर कोणत्याही प्रकारची अर्ज किंवा विनंती विचारात घेतली जाणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे.

या निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असून, प्रशासनातील कार्यपद्धती अधिक शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Government Circular Promotion Rules

Leave a Comment