Created by sangita, 13 may 2025
भारता मध्ये पेट्रोल पंप चालू करण्यासाठी किती येतो खर्च आणि किती होती कमाई जाणून घ्या संपूर्ण माहिती. Petrol Pump Business Investment
Petrol Pump Business Investment : नमस्कार मित्रांनो आज प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी आहे. प्रत्येकाला रोज पेट्रोल आणि डिझेल लागतो. अशा मध्ये तुम्ही जर पेट्रोल पंप सुरु करण्याचा विचार करत असाल तर आज चा हा लेख तुमच्या साठी आहे. या लेखा मध्ये आपन संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसे की खर्च किती येतो, त्या मधून कमाई किती होते. सर्व काही. चला तर मग वाचू या आज चा हा लेख.
का करावा पेट्रोल पंपाचा व्यवसाय ?
पेट्रोल पंप चालू करणे हे तुमच्या साठी फायदेशीर ठरु शकते. तुम्ही जीवन भर या व्यवसायातून पैसे कमाऊ शकता. कारण पेट्रोल डिझेल हे रोज लागणारी वस्तू आहे. याची गरज कधीच संपणार नाही. तुम्ही जर जागा योग्य निवडली तर तुमच्या कमाई चा अंदाजा सुद्धा लावता येणार नाही एवढी कमाई होऊ शकते. Petrol Pump Business Investment
या साठी आवश्यक पात्रता ( Eligibility Criteria )
तुम्हाला जर पेट्रोल पंपाचा लाईसेन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील बाबी पूर्ण कराव्या लागतील.
- लागणारे वय : तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे 21 वर्षा पासून ते 55 वर्ष असले पाहिजे.
- नागरिकता : अर्ज करणारा व्यक्ती हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता
- ग्रामीण भागासाठी : कमीत कमी 10 वी पास असणे अनिवार्य आहे.
- शहरी भागा साठी : तुम्ही 12 वी तरी पास असणे अनिवार्य आहे. आणि जर डिग्री असेल तर आणखीन योग्य.
- जे आरक्षित वर्गामध्ये मोडतात जसे की (SC/ST/OBC) यांच्या साठी : 10 वी पास करणे गरजेचे आहे.
- आर्थिक क्षमता : कमीत कमी 15 लाख ते 2 करोड रुपयां पर्यंत अर्जदाराची संपत्ती असली पाहिजे
- पारदर्शक नोंदी : अर्ज करणाऱ्या व्यक्ती वर पोलीस केस नसली पाहिजे.
जमिनीची गरज (Land Requirements)
पेट्रोल पंप चालू करण्यासाठी तुमचे जागेचे लोकेशन हे पॉईंट वर असणे महत्वाचे आहे.
ग्रामीण भाग :
- एक वितरण युनिट : कमीत कमी 800 मिटर
- दोन वितरण युनिट : कमीत कमी 1200 मिटर
शहरी भाग :
- एक युनिट : कमीत कमी 500 मिटर
- दोन युनिट : कमीत कमी 800 मिटर
हायवे च्या लोकेशन वर : दोन युनिट साठी 2000 मिटर ची जागा आवश्यक असते.
महत्वाची गोष्ट : जागा मालकीची असली पाहिजे कोणत्याही वांद्यात नसूने. किंवा 19 वर्ष कराराची असली पाहिजे. आणि ती जागा रोड टच असने गरजेचे आहे.
किती लागेल गुंतवणूक ( total investment )
तुमची गुंतवणूक तुमच्या पंपावर डिपेंड करते. जसे की पंपाची जागा, कंपनी कोणती आहे, त्यात असणाऱ्या मशीनरी, आणखीन काही. Petrol Pump Business Investment
महत्वपूर्ण लाइसेंस आणि परमिट
पेट्रोल पंप चालू करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे लाईसेन्स आणि परवानगी घ्यावी लागते.
1. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) – स्थानिक नगर पालिका किंवा पंचायत कडून घ्यावे लागते.
2. फायर सेफ्टी सर्टिफिकेट – अग्निशमन विभागा द्वारे
3. पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र – राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डा कडून
4. GST नोंदणी – व्यवसाया साठी महत्वपूर्ण
5. Current अकाउंट – व्यवसायात घेवाण देवाण साठी
अर्ज करण्याची प्रक्रिया ( Application Process )
1. जाहिरात पहा : LOC, BPCL, HPCL द्वारे पेपर किंवा वेबसाईट वर जाहिराती टाकल्या जातात.
ऑनलाईन अर्ज :
www.petrolpumpdealerchayan.in या वेबसाईट द्वारे तुम्ही अर्ज करू शकता.
2. लागणारे कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज फी भरा
- सामान्य क्षेत्र : 1,000 रुपये फक्त
- ग्रामीण भाग : 100 रुपये फक्त
- आरक्षित वर्ग : 50% टक्के सवलत
3. निवड प्रक्रिया :
- कागदपत्रे तपासणी
- इंटरव्यू
- साइट तपासणी
4. सुरक्षा ठेव : निवड झाल्यानंतर तुम्हाला कंपनी कडे एक निश्चित रक्कम डिपॉजीट म्हणून ठेवावी लागेल.
कमाई आणि फायदा ( Profit and Earnings )
- पेट्रोल : तुम्ही 2.5 रुपये ते 3 रुपये एक लिटर पेट्रोल विकून कमाऊ शकता.
- डिझेल : तुम्ही 1.5 रुपये ते 2 रुपये एक लिटर डिझेल विकून कमाऊ शकता.
उदाहरना मध्ये पाहू
जर दररोज 5,000 लिटर पेट्रोल आणि 3,000 लिटर डिझेल विक्री होत असेल तर :
- पेट्रोल : 5000 × ₹2.5 = 12,500 रुपये प्रॉफिट
- डीजल: 3000 × ₹1.5 = 4,500 रुपये प्रॉफिट
- दिवसाची कमाई : 17,000 रुपये
- महिन्याची कमाई : 5.1 लाख रुपये
नोंद : तुम्हाला फक्त हे उदाहरण देण्यात आले आहे. तुमच्या रोज च्या विक्री वर तुमचा प्रॉफिट ठरेल.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा. धन्यवाद….