एनपीएस व एकीकृत निवृत्ती वेतन योजनेतील प्रान खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर. NPS New Update 

Irfan Shaikh ✅

एनपीएस व एकीकृत निवृत्ती वेतन योजनेतील प्रान खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर. NPS New Update 

मुंबई : NPS New Update  : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) तसेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रान (PRAN) खात्यांमध्ये मासिक अंशदानाची रक्कम वेळेत जमा होण्यासाठी वित्त विभागाने ११ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रान खात्यात जमा होतील, यासाठी सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्राधान्याने पारित करण्यात येणार आहेत. तसेच संबंधित वेतनाचे प्रदान ई-कुबेर प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत वेतन देयकांचे प्रमाणक क्रमांक संस्कारित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  तुमचे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाते असतील. तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. Bank update june

वेतन देयकांवर “Not Payable Before the First Day of the Next Month or Due Date” असा शेरा नोंदवून पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला अथवा देय दिनांकाला वेतन अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत १४ टक्के आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना अंतर्गत १० टक्के कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची रक्कम तसेच नियोक्त्याच्या अंशदानाची देयके प्रक्रिया करण्यासाठी ई-बील सेवार्थ प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा आणि विकसन पूर्ण करण्यात आले आहे. NPS New Update 

या सुधारित प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन निधीतील अंशदान वेळेत जमा होण्यास मदत होणार असून आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना मिळणार आहे. NPS New Update 

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *