लेव्हल 1 ते 7 कर्मचारी किती पगार मिळवतील? ८व्या वेतन आयोगाचा संपूर्ण अंदाज. Fitment Factor Update

Irfan Shaikh ✅
3 Min Read

Fitment Factor Update : नमस्कार मित्रानो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी येऊ घातली आहे. केंद्र सरकारकडून ८वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील चर्चांना वेग आला असून, जर हा आयोग लागू झाला आणि त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित केला गेला, तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहेत. मात्र 7व्या आयोगाला जवळपास 10 वर्षे होऊन गेल्यानं, आता ८वा वेतन आयोग येण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. जर हा आयोग लागू झाला आणि महागाई भत्ता (DA) थेट बेसिकमध्ये समाविष्ट केला गेला, त्यावर HRA व TA दिला गेला, तर प्रत्येक स्तरातील (लेव्हल 1 ते 7) कर्मचाऱ्यांचा एकूण पगार किती होईल, ते आपण पाहूया. Fitment Factor Update

हे पण वाचा….पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त, 80,000 रुपये जमा करा आणि मिळवा 21 लाख रुपये

✅ लेव्हलनिहाय पगारवाढीचा तपशील

लेव्हल 1 कर्मचारी:

सध्या यांचा मूळ पगार ₹18,000 इतका आहे. फिटमेंट फॅक्टरनुसार तो ₹34,560 इतका होईल. त्यावर HRA (₹10,368) व वाहतूक भत्ता (₹1,350) मिळून एकूण पगार ₹46,278 होईल. कपातीनंतर निव्वळ पगार ₹42,572 च्या आसपास राहू शकतो.

लेव्हल 2 कर्मचारी:

सध्याचा मूळ पगार ₹19,900 आहे. 1.92x फिटमेंटनुसार नवीन पगार ₹38,208 इतका होईल. त्यावर ₹11,462 HRA व ₹1,350 TA मिळून एकूण पगार ₹51,020 होईल. अंदाजे निव्वळ पगार ₹46,949 राहील.

हे पण वाचा…. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे ने सुरू केली नवीन योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती

लेव्हल 3 कर्मचारी: Fitment Factor Update

सध्याचा पगार ₹21,700 असून, नवीन पगार ₹41,664 होईल. HRA ₹12,499 आणि TA ₹3,600 मिळून एकूण पगार ₹57,763 पर्यंत जाईल. कपातीनंतर निव्वळ ₹53,347 राहू शकतो.

लेव्हल 4 कर्मचारी:

मूळ पगार ₹25,500 वरून वाढून ₹48,960 होईल. HRA ₹14,688 आणि TA ₹3,600 मिळून एकूण पगार ₹67,248 होईल. निव्वळ पगार ₹62,102 च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

लेव्हल 5 कर्मचारी:

₹29,200 वरून पगार वाढून ₹56,064 होईल. यावर ₹16,819 HRA आणि ₹3,600 TA मिळून एकूण पगार ₹76,483 होईल. कपातीनंतर निव्वळ ₹70,627 पर्यंत पोहोचेल.

➤ लेव्हल 6 कर्मचारी:

सध्याचा पगार ₹35,400 असून, ८व्या आयोगामुळे तो ₹67,968 पर्यंत जाईल. HRA ₹20,390 आणि TA ₹3,600 मिळून एकूण पगार ₹91,958 होईल. निव्वळ पगार ₹84,711 इतका राहील.

➤ लेव्हल 7 कर्मचारी:

या स्तरावरील सध्याचा पगार ₹44,900 आहे. तो वाढून ₹86,208 होईल. यावर ₹25,862 HRA आणि ₹3,600 TA मिळून एकूण पगार ₹1,15,670 होईल. अंदाजे निव्वळ पगार ₹99,739 इतका असू शकतो.

Fitment Factor Update

हे ही वाचा….1 तारखे पर्यंत जर नाही भरला तुम्ही हा फॉर्म, तर तुमची पेन्शन बंद होणार

📌 हे लक्षात ठेवा:

  1. ही सगळी आकडेवारी फक्त अंदाजावर आधारित आहे.
  2. ८वा वेतन आयोग अद्याप अधिकृतपणे घोषित झालेला नाही.
  3. 2026 मध्ये तो लागू होण्याची शक्यता आहे, कारण 7व्या आयोगाला 10 वर्षे पूर्ण होतील.
  4. वास्तविक पगार सरकारच्या निर्णयावर व वित्तीय परिस्थितीवर अवलंबून असेल.
Share This Article
Follow:
नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *