बीड विभागात महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

Irfan Shaikh ✅

बीड, दि. 25 (प्रतिनिधी): Maharashtra Transport Workers News :   एकमेव मान्यता प्राप्त महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या बीड विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी उत्साहात पार पडली. जालना रोडवरील हॉटेल यशराज इन येथे आयोजित या सभेला विभागातील विविध आगारांमधील पदाधिकारी, डिलिगेट्स व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी गेवराई आगाराचे मा. ज्ञानेश्वर चातूर होते. कार्यक्रमाची सुरुवात कामगारांचे प्रेरणास्थान स्व. भाऊ फाटक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सभागृहात विविध घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या सभेत बीड विभागीय अध्यक्षपदी मा. ज्ञानेश्वर चातूर यांची तर विभागीय सचिवपदी मा. गणेश बापू चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी रमेश भाऊ गीते, संघटक सचिवपदी श्रीवल्लभ चिरके, सहसचिवपदी विजय कुडके आणि कोषाध्यक्षपदी विलास आजले यांचीही निवड करण्यात आली.

हे ही वाचा 👇🏻  १ नोव्हेंबरपासून या वाहनांच्या प्रवेशावर बंदी, जानून घ्या संपूर्ण माहिती. Vehicle Ban

यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी रमेश भाऊ गीते यांनी संघटना बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर चातूर यांनी संघटनेच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेत, विविध आगारांतील प्रश्न संघटनेमार्फत कसे सोडवले जातात यावर भाष्य केले. भविष्यात कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विभागीय सचिव गणेश बापू चव्हाण यांनी संघटना ही कामगारांनी कामगारांसाठी उभी केलेली असून तिचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही, असे ठामपणे सांगितले. कार्यतत्पर नेतृत्वामुळे अनेक प्रश्न तातडीने मार्गी लागल्याची उदाहरणे त्यांनी मांडली.

हे ही वाचा 👇🏻  बँकांनी क्रेडिट कार्डसाठी नवीन वैशिष्ट्ये आणली, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Bank Credit card update

यावेळी संघटनेचे ज्येष्ठ बीड विभागीय सहसचिव श्रीकांत येडे पाटील, महादेव जाधव, मीडिया प्रमुख महेश लोंढे तसेच पाटोदा आगाराचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष बीड आणि बीड विभागातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. Maharashtra Transport Workers News

कार्यक्रमाच्या शेवटी संघटक सचिव वल्लभ चिरके यांनी आभार प्रदर्शन केले. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर कामगारांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत संघटनेची वाटचाल अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. Maharashtra Transport Workers News

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *