पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन जाहीर. EPFO New Registration Benefit

नवी दिल्ली : EPFO New Registration Benefit  नोकरीची सुरुवात करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVY / PMVRY) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना
15,000 रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती कामगार व रोजगार मंत्रालयाने अधिकृत ट्विटद्वारे दिली आहे.

या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना थेट लाभ होणार असून, नोकरीच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक आधार मिळणार आहे.

कोणाला मिळणार 15,000 रुपयांचा लाभ? EPFO New Registration Benefit

मंत्रालयाच्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ
फक्त पहिल्यांदाच EPFO (Employees’ Provident Fund Organisation) मध्ये नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  FASTAG ऐवजी आता GNSS टोल सिस्टम, लवकर करा स्वीच नाहीतर तुम्हाला दंड बसू शकतो. नवीन मार्ग जाणून घ्या. Fastag new rules

म्हणजेच, जे कर्मचारी पहिल्यांदाच नोकरीत प्रवेश करतात आणि ज्यांचे याआधी EPF खाते कधीच उघडलेले नाही,
अशाच कर्मचाऱ्यांना या योजनेस पात्रता असणार आहे.

या योजनेची सविस्तर माहिती
pmvry.labour.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचे EPFO मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

EPF नोंदणी कशी होते? EPFO New Registration Benefit

नोकरी सुरू करताना नियोक्ता कर्मचाऱ्याचे EPF खाते उघडतो.
हे खाते आधार आणि बँक खात्याशी लिंक केले जाते.
EPFO नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना सरकारकडून
15,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाते.

इच्छुक उमेदवार स्वतःही अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

हे ही वाचा 👇🏻  या तारखेला ला सुट्टी जाहीर, शाळा, कॉलेज आणि बँका राहणार बंद, जाणून घ्या कारण.Public holiday reason today

PF काढण्याचे नियम अधिक सुलभ

दरम्यान, EPFO सदस्यांसाठी PF काढण्याच्या नियमांमध्येही सुलभता आणण्यात आली आहे.
नवीन नियमानुसार कर्मचारी खालील कारणांसाठी PF मधून रक्कम काढू शकतात –

  • लग्नासाठी
  • घर खरेदी किंवा घर नूतनीकरणासाठी
  • मुलांच्या शिक्षणासाठी
  • वैद्यकीय उपचारांसाठी

नोकरी गमावल्यास, एकूण PF रकमेपैकी
75 टक्के रक्कम तात्काळ काढता येते,
तर उर्वरित 25 टक्के रक्कम 12 महिन्यांच्या बेरोजगारीनंतर काढण्याची मुभा आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी मोठी सवलत

लग्नासाठी 7 वर्षांच्या सेवेनंतर PF मधील
50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येते.
तर वैद्यकीय उपचारांसाठी कोणत्याही सेवा कालावधीची अट नसून,
संपूर्ण PF रक्कम किंवा 6 महिन्यांचा पगार काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

हे ही वाचा 👇🏻  केंद्र सरकारकडून मोठा निर्णय? 5 वर्षांपासून अडकलेला DA थकबाकी मिळणार का? Panding Da update

PF ATM कार्ड लवकरच?

लवकरच EPFO कडून PF ATM कार्ड सुविधा सुरू होण्याची शक्यता असून,
यामुळे PF व्यवहार अधिक जलद आणि सोपे होणार आहेत.

तरुणांसाठी मोठा दिलासा EPFO New Registration Benefit

एकूणच, PMVY योजनेअंतर्गत मिळणारे
15,000 रुपयांचे प्रोत्साहन आणि PF नियमांतील सुलभता
ही नव्याने नोकरी सुरू करणाऱ्या तरुणांसाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

Leave a Comment