दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर विशेष आढावा बैठका. Disabled Government Employees

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर विशेष आढावा बैठका. Disabled Government Employees

मुंबई : Disabled Government Employees   दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

जिल्हा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी आणि मागण्या थेट ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने या बैठका घेण्यात येणार आहेत. या विशेष बैठकांचे अध्यक्षस्थान संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी भूषवणार असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा 👇🏻  आजपासुन 7 मोठे नियम,  LPG, EPFO, क्रेडिट कार्ड, म्युच्युअल फंड वापरकर्त्यांनी जरूर वाचावे. June rule changes 2025

तक्रारींवर निर्णय व अहवाल शासनाला सादर.

या बैठकीत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मांडण्यात येणाऱ्या तक्रारी, त्यावर घेण्यात आलेले निर्णय तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आयुक्त, दिव्यांग कल्याण विभाग आणि राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच, बैठकीदरम्यान शासनस्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या मुद्द्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. Disabled Government Employees

यामुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.

दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिरे

दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करता, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Disabled Government Employees

हे ही वाचा 👇🏻  यावर्षी मोदी सरकार इतक्या पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र बनवणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Life certificate news august

या उपक्रमांमुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक तसेच प्रशासकीय अडचणी अधिक प्रभावीपणे सोडवता येतील, असा विश्वास सचिव तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment