Contract Employees Permanent : नमस्कार मित्रानो राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या
कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या कंत्राटी
कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी (Permanent) सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाने घेतला आहे. NHM Employees Permanent Job
१० वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्यांना मोठा दिलासा
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक कर्मचारी मागील १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने
सेवा देत आहेत. आजपर्यंत त्यांना नोकरीची कोणतीही शाश्वती नव्हती. शासनाच्या नव्या निर्णयानुसार
१० वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.
कंत्राटी नोकरीतील अनिश्चितता संपणार. NHM Employees Permanent Job
कंत्राटी पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन, पदोन्नतीचा अभाव, निवृत्तीवेतन,
भविष्य निर्वाह निधी (PF) आणि वैद्यकीय सुविधा यांसारखे लाभ मिळत नव्हते.
मात्र, कायम सेवेत समावेश झाल्यानंतर हे सर्व शासकीय लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
पुढील टप्प्यात वेतन निश्चिती
या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतही सकारात्मक बदल होणार आहेत.
शासनाच्या नियमानुसार पुढील टप्प्यात वेतनश्रेणी निश्चित करून नियमित वेतन दिले जाणार आहे.
कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ?
- राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी कर्मचारी
- ग्रामीण व शहरी आरोग्य केंद्रांतील कर्मचारी
- उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी
- तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी
मानधनात 95 टक्के वाढ
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी
कर्मचाऱ्यांच्या मानधनात सरासरी 95 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.
आता कायम सेवेत समावेशामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होणार आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांनी शासनाच्या
या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




