राज्यातील या कर्मचाऱ्यांचे वय 2 वर्षानी कमी करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी. Retirement Age Reduction News

Retirement Age Reduction News :  राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी कमी करण्याबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय (GR) 17 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टता आली आहे.

मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मान्यता

राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 20.02.2024 च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय संवर्गासाठी विहीत करण्यात आलेले सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे हे यापुढेही कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  जबरदस्त बजेट फोन Poco M6 5G भारतात लॉन्च – पहा फिचर्स, किंमत आणि ऑफर्स.Poco M6 5G price

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा

राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमधील काही शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतरही मा. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आपली कर्तव्ये बजावली होती. अशा याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीचे वेतन संबंधित विद्यापीठांनी अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. Retirement Age Reduction News

वेतन, रजा व वार्षिक वेतनवाढीबाबत निर्णय

शासन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील बाबी लागू राहतील —

  • संबंधित कर्मचारी 60 वर्षे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत, असे समजण्यात येईल
  • वाढीव कालावधीत प्रत्यक्ष काम केले असल्यास त्या कालावधीचे वेतन देय राहील
  • कर्मचाऱ्यांच्या खात्यात अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास, त्या रजेचे लाभ देण्यात येतील
  • या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही
  • त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1981 मधील वित्त विभागाच्या तरतुदी लागू राहतील
हे ही वाचा 👇🏻  पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, जाणुन घ्या संपूर्ण माहिती.EPFO Pension today News

कर्मचाऱ्यांसाठी स्पष्टता निर्माण करणारा निर्णय

हा शासन निर्णय कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला असून, सेवानिवृत्ती व त्यानंतरच्या वेतन व सेवा लाभांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. Retirement Age Reduction News

Leave a Comment