Post office scheme new :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सुद्धा तुमचा पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करन्याचा विचार करत असाल. तर आज आपण जी पोस्ट ऑफिस ची योजना पाहणार आहोत. ते तुमच्या गुंतवणूकी साठी योग्य आहे. ही योजना तुमच्या साठी बेस्ट राहणार आहे. कारण पोस्ट ऑफिस ची ही योजना सरकार मान्य आहे.आणि या मध्ये रिस्क सुद्धा फार कमी आहे.
सध्या जर आपण बाहेर चा विचार केला तर मार्केट मध्ये अशा अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. जिथे कि तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण तरी सुद्धा आज ही अनेक लोकांचा भरोसा पोस्ट ऑफिस च्या योजना वर आहे. तर आज आपण पोस्ट ऑफिस ची सर्वात चांगली योजना कोनती आहे. ते या लेखा मध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या योजना बद्दल. Post office scheme
1. पोस्ट ऑफिस मासिक गुंतवणूक योजना
पोस्ट ऑफिस ची ही योजना एक अशी योजना आहे. जी कि प्रत्येक महिन्याला तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न देते. आणि ही जी योजना आहे. ही योजना त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना कि महिन्याला उत्पन्ना ची गरज भासते.
मुख्य वैशिष्ट्ये
- व्याज दर :- 7.4 % टक्के दर वर्षी
- गुंतवणूकीचा काळ :- 5 वर्ष
- जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा
- वयक्तिक अकाउंट :- 9 लाख रुपये
- संयुक्त अकाउंट :- 15 लाख रुपये
2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
पब्लिक प्रोविडंट फंड ही जे योजना आहे. जर तुम्हाला जास्त काळा साठी तुमची रक्कम गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या साठी PPF ही योजना अधिक फायदेमंद आहे. तुमची रक्कम येथे सुरक्षित तर राहणारच पण तुम्हाला या योजने मध्ये कर ही भरावा लागणार नाही.public provident fund
मुख्य वैशिष्ट्ये
- व्याज दर :- 7.1 % टक्के दर वर्षी
- गुंतवणूकीचा कालावधी :- 15 वर्ष
- कर सूट :- 1.5 लाख पर्यंत
3. सुकन्या समृद्धी योजना
तुम्हाला सुद्धा जर मुलगी असेल तर तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि पुढे चालुन तिच्या लग्ना साठी. ही सुकन्या समृद्धी योजना एकदम बेस्ट आहे. या योजने मध्ये एक तर व्याज दर जास्त मिळतोच आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला कर आकारला जात नाही. sukanya samriddhi yojana
मुख्य वैशिष्ट्ये
- व्याज दर :- 8.2 टक्के दरवर्षी
- तुमच्या मुलीचे वय :- 10 वर्षा च्या आत असणे गरजेचे आहे.
- किमान गुंतवणूक :- 250 रुपये दरवर्षी
- जास्तीत जास्त गुंतवणूक :- 1.5 लाख दरवर्षी
- परिपक्वता :- 21 वर्ष किंवा तुमच्या मुलीच्या लग्ना पर्यंत
4. जेष्ठ नागरिक बचत योजना
तुम्ही सुद्धा जर का जेष्ठ नागरिक असाल तर तुमच्या साठी सर्वात उपयुक्त योजना म्हणजे SCSS. या मध्ये व्याज दर सुद्धा इतरांपेक्षा अधिक आहे. आणि या सोबतच तुम्हाला कमाई सुद्धा दिली जाते. Senior citizen scheme
मुख्य वैशिष्ट्ये
- व्याज दर :- 8.2 टक्के दरवर्षी
- गुंतवणूकीची मर्यादा :- 30 लाखा पर्यंत
- कालावधी :- 5 वर्ष ( तुम्ही या मध्ये कालावधी वाढऊन सुद्धा घेऊ शकता. )
- पात्रता :- 60 वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त
5. पोस्ट ऑफिस वेळ ठेव योजना
पोस्ट ऑफिस ची मुदत ठेव. ही एक योजना सारखीच असते. ही योजना एक विशिष्ट काळा साठी एकदाच गुंतवणूकवर व्याज प्रदान करते.post office scheme
मुख्य वैशिष्ट्ये
गुंतवकीचा कालावधी :- 1, 2,3 आणि 5 वर्ष
व्याज दर :- एका वर्षा च्या गुंतवणूकीवर :- 6.9 टक्के
दोन वर्षा च्या गुंतवणूकीवर :- 7.0 टक्के
तीन वर्षा च्या गुंतवणूकीवर :- 7.1 टक्के
पाच वर्षा च्या गुंतवणूकीवर :- 7.5 टक्के
6. पोस्ट ऑफिस आवर्ती योजना
जे कोणी लहान गुंतवणूक दार असतील तर त्यांच्या साठी पोस्ट ऑफिस ची RD ही योजना एकदम उत्तम पर्याय आहे. कारण या मध्ये गुंतवणूक दार कमीत कमी गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे ही एक बेस्ट योजना आहे. RD scheme
मुख्य वैशिष्ट्ये
गुंतवकीचा कालावधी :- 5 वर्ष
व्याज दर :- 6.7 टक्के दरवर्षी
मासिक ठेव रक्कम :- कमीत कमी 100 रुपये
कोणती योजना तुमच्या साठी आहे उत्कृष्ट
तर मित्रांनो तुम्ही सुद्धा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि जर का समजत नसेल की कोणत्या योजने मध्ये गुंतवणूक करावी तर तुमच्या साठी पोस्ट ऑफिस ची बचत योजना ( Saving Scheme ) एक उत्तम पर्याय आहे. तरी सुद्धा तुम्ही खात्री करून या योजने मध्ये गुंतवणूक करावी. Investment planning
जर मासिक उत्पन्न पाहिजे तर :- POMIS
दीर्घकालीन गुंतवणूक योजना :- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( ppf )
मुलीच्या भविष्यासाठी बचत :- सुकन्या समृद्धी योजना
निवृत्त झालेले कर्मचारी :- SCSS. SCHEME
लहान मासिक बचत :- RD
एकरकमी सुरक्षित गुंतवणूक :- वेळ ठेव योजना

नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .