राज्यात प्रथमच एस. टी.अधिकाऱ्यांमध्ये निलंबनाची धास्ती? कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये  भीतीचे वातावरण

Irfan Shaikh ✅

प्रतिनिधी |

Msrtc-Mfficer-Suspension : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर राज्यातील संपूर्ण एसटी प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कारवाईचा परिणाम केवळ संबंधित अधिकाऱ्यांपुरता मर्यादित न राहता चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नाशिक विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आणि कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या निर्णयानंतर राज्यभरातील  अधिकाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, कामकाजात बदल करण्यात आलेला आहे, सध्या अधिक दक्ष होऊन काम करत असताना प्रशासन दिसत असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा 👉🏻  लाडकी बहीण’ योजनेत गैरवापर उघड; ५ हजार कर्मचारी रडारवर, जानेवारी - फेब्रुवारी चा 3000 चा हप्ता लवकरच जमा. Ladaki bahin yojana 2026

आतापर्यंत कामगारांवर कारवाई, आता अधिकाऱ्यांचीही धास्ती

एसटी वर्तुळात अशी भावना व्यक्त केली जात आहे की, यापूर्वी शिस्तभंगाच्या कारवाईचा फटका प्रामुख्याने चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनाच बसत होता. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही थेट निलंबनाची कारवाई झाल्याने आता अधिकाऱ्यांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, एसटीच्या इतिहासात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अशा प्रकारे निलंबनाची भीती निर्माण झाल्याची चर्चा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगार व्यवस्थापनातील विविध कामकाजात निष्काळजीपणा आढळल्याने विभागीय स्तरावरील काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विभागीय अभियंता, यंत्र अभियंता, लेखाधिकारी, भांडार अधिकारी तसेच इतर वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा 👉🏻  वाहन चालकांना मोठी बातमी, आता या महामार्गावर फक्त अर्धा टोल टॅक्स द्यावा लागेल. Toll tax new rule

दरम्यान, यानंतर रायगड, सातारा, जळगाव, अमरावती आणि कणकवलीसह इतर काही विभागांमध्येही अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत . त्यामुळे संपूर्ण एसटी प्रशासनात जबाबदारी आणि उत्तरदायित्व अधिक कडक करण्यात येत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, काही कर्मचारी संघटनांनी संबंधित अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्याचा दावा करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या घडामोडींमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आगारापासून विभागीय कार्यालयांपर्यंत कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील या कारवाईनंतर एसटी प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Pages

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *