Wed. Feb 11th, 2026

    ईपीएफओचे नवे मोबाइल अ‍ॅप एप्रिलमध्ये लाँच; यूपीआयद्वारे थेट पीएफ काढता येणार. EPFO New App

    नवी दिल्ली :  EPFO New App कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच ईपीएफओ एक नवीन मोबाइल अ‍ॅप्लिकेशन लाँच करणार असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून सदस्यांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून थेट त्यांच्या बँक खात्यात पीएफ निधी काढता येणार आहे.

    अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. या अंतर्गत पीएफचा एक विशिष्ट भाग सुरक्षित ठेवण्यात येणार असून, उर्वरित पात्र रक्कम यूपीआयद्वारे सहज काढण्याची सुविधा दिली जाणार आहे. EPFO New App

    हे ही वाचा 👇🏻  तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? नवीन नियम जाणून घ्या.Cash Limit at Home

    या नव्या अ‍ॅपमुळे ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या पात्र पीएफ शिल्लकीची माहिती मोबाइलवरच पाहता येणार आहे. तसेच पासबुक बॅलन्स पाहणे, निधी हस्तांतरण करणे अशा अनेक सेवा एका क्लिकवर उपलब्ध होतील. निधी काढताना सदस्यांना त्यांच्या लिंक केलेल्या यूपीआय पिनचा वापर करावा लागणार असून, त्यामुळे व्यवहार अधिक सुरक्षित राहणार आहेत. EPFO New App

    सध्या या सेवेची चाचणी सुरू असून, सर्व काही नियोजित वेळापत्रकानुसार झाल्यास एप्रिल 2026 मध्ये हे अ‍ॅप लाँच होण्याची शक्यता आहे. या नव्या सुविधेचा लाभ देशातील सुमारे ८ कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांना होणार आहे.

    By Irfan Shaikh ✅

    नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *