प्रथम नियुक्तीतील वयाधिक्याबाबत शासन निर्णय; 45 कर्मचाऱ्यांना लाभ. Maharashtra Government Resolution 2026

प्रथम नियुक्तीतील वयाधिक्याबाबत शासन निर्णय; 45 कर्मचाऱ्यांना लाभ. Maharashtra Government Resolution 2026

मुंबई :  Maharashtra Government Resolution 2026  :  नमस्कार मित्रानो उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक 09 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील 45 कर्मचाऱ्यांच्या प्रथम नियुक्तीच्या दिनांकास असणारे वयाधिक्य क्षमापित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

सदर निर्णयात नमूद करण्यात आले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती विहित कार्यपद्धतीनुसार करण्यात आलेली आहे, जे कर्मचारी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात तसेच जे कर्मचारी न्यायालयीन प्रकरणांमध्ये समान स्थितीत आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही मान्यता देण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  9 कोटींपेक्षा जास्त PF खातेधारकांसाठी चांगली चांगली बातमी. नवीन सुविधा सुरू होणार. Pf account update

मात्र, शासनाने स्पष्ट केले आहे की ही मान्यता फक्त वयाधिक्य क्षमापित करण्यापुरतीच मर्यादित राहील. संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तसेच निवृत्तीविषयक बाबींवर शासनाच्या प्रचलित नियमांनुसारच पुढील कार्यवाही करावी लागणार आहे.

हे ही वाचा…. 🙏🏻

PF कधी आणि किती काढता येतो? नियम, फायदे आणि नुकसान सविस्तर जाणून घ्या. 

तसेच, या निर्णयात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, सदर वयाधिक्य क्षमापित करण्याची मान्यता ही अपवादात्मक स्वरूपाची असून, या प्रकरणाचा कोणत्याही परिस्थितीत पूर्वोदाहरण (precedent) म्हणून वापर करता येणार नाही. Maharashtra Government Resolution 2026

या शासन निर्णयामुळे संबंधित 45 कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मात्र इतर प्रकरणांमध्ये याचा संदर्भ घेता येणार नाही, असे शासनाने ठामपणे नमूद केले आहे.

हे ही वाचा 👇🏻  जेष्टांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, सर्वांसाठी १ जानेवारी २०२६ पासून हे नियम बदलनार, आजच तुमचे फायदे जाणून घ्या. New rule 2026

EPS-95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट; 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही. 

 

Leave a Comment