Wed. Feb 11th, 2026

     

    प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! एस टी च्या ताफ्यात राजमाता जिजाऊ बसेस दाखल. MSRTC New Buses

    मुंबई | 9 फेब्रुवारी २०२६
    MSRTC New Buses : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच ५५ अत्याधुनिक, अधिक आसन क्षमतेच्या (3×2) बसेस दाखल होणार आहेत. या नव्या बसेसना ‘हिंदवी स्वराज्याची जननी’ राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

    या बसेसमध्ये ३ बाय २ आसन रचना असून तब्बल ५५ प्रवासी आरामात प्रवास करू शकणार आहेत. सध्याच्या बसेसपेक्षा ही क्षमता अधिक असल्याने गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    हे ही वाचा 👇🏻  नवीन योजना लागू, कर्मचाऱ्यांना होणार फायदा.Employees August update

    मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने या बसेस राज्यभर धावणार असून, इतिहासाचा सन्मान आणि आधुनिकतेचा संगम साधणारा हा उपक्रम असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
    ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव केवळ नामकरण नसून, स्वराज्याच्या प्रेरणेचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. MSRTC New Buses 

    👉 एसटीचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि अभिमानास्पद होणार!

    By Irfan Shaikh ✅

    नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *