मुंबई | प्रतिनिधी. दि 8 फेब्रुवारी 2026
Maharashtra ST Strike News : राज्यातील एसटी बस प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यात वाढीव वेतनाचा फरक (Arrears) न मिळाल्याने तीव्र असंतोष पसरला असून, येत्या तीन दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे.
वाढीव वेतन न मिळाल्याचा आरोप
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, “या महिन्यात वाढीव वेतनाचा फरक न देणे ही कर्मचाऱ्यांची घोर फसवणूक आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आलेल्या निधीसोबतच वाढीव वेतनाचा फरक देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
10 तारखेपर्यंत मुदत. Maharashtra ST Strike News
बरगे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की,
“येत्या 10 तारखेपर्यंत वाढीव वेतनाचा फरक न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
एसटी महामंडळावर मोठा आर्थिक भार
- एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी सुमारे 475 कोटी रुपये खर्च येतो
- वाढीव वेतन फरकासाठी दरमहा 58.30 कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक
- सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीच्या फरकासाठी दरमहा 65 कोटी रुपये देण्याची घोषणा
ही घोषणा 13 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ही रक्कम सरकारकडून मिळालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून पैसे दिले. Maharashtra ST Strike News
राज्य सरकारची प्रतिमा वाचवण्यासाठी एसटी महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून दोन महिन्यांचा वाढीव वेतनफरक कर्मचाऱ्यांना अदा केला होता.
या महिन्यात तीन महिन्यांची एकत्रित 116.69 कोटी रुपयांची रक्कम देण्यात यावी, असे पत्र महामंडळाने 20 जानेवारी 2026 रोजी राज्य सरकारकडे पाठवले होते.
तरीही निधी न आल्याने, या महिन्यात कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा फरक न देता केवळ मूळ वेतन देण्यात आले, असा गंभीर प्रकार घडला आहे.
वैधानिक देणी थकीत असतानाही दुर्लक्ष
एकीकडे एसटी महामंडळावर सुमारे 4200 कोटी रुपयांची वैधानिक देणी थकीत असताना, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन न देणे ही सरळ अवहेलना असल्याचे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा – प्रवाशांचे हाल संभवतात. Maharashtra ST Strike News
जर येत्या तीन दिवसांत वाढीव वेतनफरकाची रक्कम मिळाली नाही, तर एसटी कर्मचारी रीतसर नोटीस देऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
यामुळे राज्यभरात एसटी बस सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता असून, त्याचा थेट फटका लाखो प्रवाशांना बसू शकतो.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .





