Wed. Feb 11th, 2026

    वैधानिक देणी थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट. Employees Salary Update 

    मुंबई | प्रतिनिधी, दि. 7 जानेवारी 2026

    Employees Salary Update :  राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वैधानिक देणी आणि वेतनासाठी लागणारा निधी वेळेत न मिळाल्यामुळे गंभीर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीत मोठी तूट असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सुमारे ४७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असतो. यामध्ये वेतनाबरोबरच फरकाची रक्कम धरल्यास एकूण खर्च ५२५ कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र राज्य सरकारकडून केवळ ४०० कोटी रुपये इतकाच निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे या अगोदर अर्थ खाते होते, प्रत्येक महिन्याला निधी ST कडे वर्ग करण्यात येत होता 

    हे ही वाचा 👇🏻  आता जेष्ठ नागरिकांना फ्री मध्ये मिळणार या सुविधा, लाभ कसा घ्यावा, जाणून घ्या सर्व माहिती.Senior citizens saving schemes

    हे ही वाचा 

    अर्जित रजा  ( इन्कशमेंट )रोखीकरणाबाबत राज्य सरकारचा नवा GR पहा 

    मात्र यावेळेस सरकार कडून निधीची कटोती करण्यात आलेली आहे . या अपुऱ्या निधीमुळे फेब्रुवारी महिन्यातही वैधानिक देणी संबंधित संस्थांना देण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, एसटी महामंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे वेतन व फरकासाठी एकूण ५२५ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यापैकी केवळ ४०० कोटी रुपयेच मिळाल्याने मोठ्या प्रमाणात देणी प्रलंबित राहिली आहेत.

    हे ही वाचा 

    अर्जित रजा  ( इन्कशमेंट )रोखीकरणाबाबत राज्य सरकारचा नवा GR पहा 

    हे ही वाचा 👇🏻  SBI, BoB आणि IDBI बँक ४४४ दिवसाच्या FD वर देत आहेत बंपर परतावा, जाणून घ्या किती मिळणार व्याज.444 Days Special FD

    वैधानिक देणी वेळेत न मिळाल्यास भविष्यात एसटी महामंडळाला अधिक आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

    By Irfan Shaikh ✅

    नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *