तिसरा हप्ता न मिळाल्याने मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे बीड विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तिसरा हप्ता न मिळाल्याने मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे बीड विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

प्रतिनिधी – आर. आर. शेख 

बीड : ST Employees Protest Beed : नियमित वेतनासोबत दर महिन्याच्या 7 तारखेला 2020 ते 2024 या कालावधीतील फरकाच्या रकमेचा हप्ता जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले असतानाही तिसरा हप्ता न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आज, 12 तारखेला, बीड विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मागील दोन हप्ते कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा झाले होते. मात्र तिसरा हप्ता अद्याप न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नियमित वेतनासोबत फरकाची रक्कम देण्याचा निर्णय झाल्यानंतरही प्रशासनाकडून विलंब होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असताना महागाई भत्त्यात १०% वाढ, या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा. Da hike February 

आज सकाळपासून विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनामुळे परिसर काही काळ दणाणून गेला. “तिसरा हप्ता तात्काळ जमा करा”, “कर्मचाऱ्यांवर अन्याय बंद करा” कामगार संघटनेचा विजय असो, अशा घोषणांनी वातावरण तापले होते.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तिसरा हप्ता लवकरात लवकर जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात विभागीय सचिव गणेश चव्हाण, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर चातुर, सहसचिव विजय कुडके, संघटन सचिव वल्लभ चिरके यांच्यासह बीड विभागातील मान्यताप्राप्त संघटनेचे सदस्य आणि मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी उपस्थित होते.

हे ही वाचा 👇🏻  अमेरिकेवर लावलेले परस्पर लादलेले कर भारताच्या फायद्याचे असतील का? तज्ञांचे मत.Trump tariffs on India

दरम्यान, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लवकर लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment