पाटोदा आगारात इंटकला मोठा धक्का! २५ पदाधिकाऱ्यांचा राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश

🚨 पाटोदा आगारात इंटकला मोठा धक्का! २५ पदाधिकाऱ्यांचा राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश

पाटोदा | प्रतिनिधी- आर. आर. शेख 

पाटोदा आगारात इंटक संघटनेला मोठे खिंडार पडले असून विभागीय सचिवांसह तब्बल २५ जणांनी राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक एसटी कामगार राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

🔴 विभागीय सचिवांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

विभागीय सचिव श्रीकांत येडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या सोबत इंटक पाटोदा आगार अध्यक्ष शाहफैज शेख, कार्याध्यक्ष बाळू डफळ, उपाध्यक्ष रंजित राऊत, तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश चवरे, रामभाऊ गायकवाड, वसंत मडावी, रसूल शेखदिलीप पाचनकर, खान भाई, सूर्यकांत पारखे, दुधाळ एस ए ,जाधव महादेव, रावसाहेब शिंदे, त्रिंबक शिंदे, पोपट व्हरकटे,  कराड एस.एस,  शिवाजी गणगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकृतरित्या प्रवेश जाहीर केला.

हे ही वाचा 👇🏻  महिलांना दरमहा मिळणार रोजगार आणि कमाईची संधी, असे करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती.lic vima sakhi yojana apply online

⚡ संघटनात्मक समीकरणात मोठा बदल

या प्रवेशामुळे पाटोदा आगारातील संघटनात्मक समीकरणे पूर्णपणे बदलले असल्याची चिन्हे दिसत आहेत. इंटक संघटनेतील अनेक सक्रिय पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी निर्णय घेतल्याने स्थानिक पातळीवर इंटकला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नवीन संघटनेत प्रवेश करताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “कामगारांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका, न्यायासाठी सातत्याने लढा आणि पारदर्शक नेतृत्व यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.”

🚌 एसटी कामगारांमध्ये चर्चेला उधाण

राज्यातील एकमेव मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे पाटोदा आगारासह परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात या संघटनेची ताकद वाढणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

हे ही वाचा 👇🏻  आता वृद्धापकाळात मोठा आधार मिळनार, पहा संपूर्ण माहिती. Senior Citizen February update 

🔎 पुढील राजकीय परिणाम?

या प्रवेशानंतर इंटक संघटना आपली ताकद कशी टिकवून ठेवणार, तसेच इतर आगारांमध्येही असेच बदल होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment