Pradhanmantri vishwakarma scheme :- नमस्कार मित्रांनो भारत सरकार ने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की कारिगारांना आर्थिक मजबूत बनवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. चला तर मग या योजने बद्दल जाणून घेऊ या सविस्तर माहिती.
🔺काय आहे या योजनेचा उद्देश
Pradhanmantri vishwakarma yojana अशी आहे की कारिगर पुढे गेला पाहिजे. त्याची जे हस्तकला आहे ते जगा समोर आली पाहिजे तो आर्थिक मजबूत बनला पाहिजे तो डिजिटल झाला पाहिजे
🔵मुख्य फायदे काय आहेत.
कारिगर तो पुढे जावा या साठी कोणत्याही ग्यारंटी शिवाय त्याला 3 लाख पर्यंत कर्ज प्रदान केले जाते. याच्या व्याजाचा ( interest rate ) चा जर आपण विचार केला तर वर्षा ला 5 टक्के ( interest ) व्याज दर आकारला जातो. हे कर्ज 2 टप्प्यात प्रदान केले जाते.
कारिगराला 1 लाखा पर्यंत कर्ज दिला जातो त्याची परत फेड ही 18 महिन्याची असते.
2 लाख रुपयांपर्यंत कर्ज ( loan ) देण्यात येतो त्या कर्जाची ( loan ) परत फेड ही 30 महिन्यात करणे आवश्यक आहे. पन हे जर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला आगोदरचे जे काही कर्ज आहे ते संपूर्ण कर्ज फिटलेले असावे. त्या नंतरच हे कर्ज दिले जाईल
कौशल्य सुधारणा प्रशिक्षण :- या योजने अंतर्गत करिगर प्रशिक्षण घेत असताना त्यांना दररोज त्यांच्या वयक्तिक खर्चा साठी 500 रुपये दिले जातात आणि प्रशिक्षण 15 दिवसा साठी असते.Pradhanmantri vishwakarma yojana
3. टूलकिट प्रोत्साहन :- करिगरांनी त्यांचे प्रशिक्षण संपवल्या नंतर त्यांना एक टूलकीट दिला जातो त्याची किंमत हें बाजारात 15 हजार रुपये आहे.
4. डिजिटल व्यवहार प्रोत्साहन :- या योजने द्वारे करिगरांनी डिजिटल व्यवहार केला तर त्यांना प्रत्येक व्यवहारा मागे 1 रुपया दिला जातो.
5. बाजार प्रतिबद्धता :- करिगारांचे जर कोणते प्रॉडक्ट्स असतील आणि ते त्यानां सेल करायचे असेल तर त्यानां ब्रॅडींग साठी पॅकेज दिला जातो आणखीन वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात.Pradhanmantri vishwakarma yojana
⭕या साठी काय आहे पात्रता निकष
वय :- तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुमचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजे त्या पेक्षा कमी चालणार नाही
व्यवसाय :- तुम्ही जर अर्ज करत असाल आणि दुसरा कोणी काम करत असेल तर ते चालणार नाही त्या साठी तुम्ही स्वतः काम करावे लागेल
इतर योजनांचा लाभ :- तुम्हाला या साठी एक अट टाकण्यात आली आहे. ते म्हणजे तुम्ही इतर कोणते कर्ज घेतलेले नसावे. जर घेतले ही असेल तर ते संपूर्ण फेडलेले असावे त्या नंतरच या योजने चा लाभ मिळेल
सरकारी सेवा :- तुम्हाला जर कोणती सरकारी नौकरी नसेल तरच तुम्ही या योजने साठी पात्र असु शकता अन्यथा तुम्हांला या योजने चा लाभ घेता येणार नाही
एका परिवारात एक व्यक्ती :- तुमच्या परिवारात जर एका व्यक्ती ने या योजनेचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या व्यक्ती ला लाभ घेता येणार नाही.
रेल्वेचा मोठा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि स्वस्त प्रवास. Seniors Railway new scheme
◻️पात्र व्यवसाय
या मध्ये 18 व्यवसाय आहेत ते खालील प्रमाणे :
- सुतार
- बोट बांधणारा
- शस्त्रे निर्माता
- लोहार
- हातोडा आणि टूल किट उत्पादक
- कुलूप बनवणारा
- मूर्तिकार
- दगड फोडणारा
- सोनार
- कुंभार
- बूट बनवणारा
- गवंडी
- झाडू बनवणारा
- खेळणी बनवणारा
- कारागीर
- फुलांचे हार बनवणारा
- लॉंड्री वाला
- कपडे शिवणार
अर्ज प्रक्रिया
1. तुम्हाला अर्ज करण्यासाठी pmvishwakarma.gov.in या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटर ला जाऊन सुद्धा अर्ज करू शकता.
2. तुमची नोंदणी पूर्ण झाल्या नंतर 3 टप्प्यात पडताळणी केली जाईल. त्या मध्ये :
ग्राम पंचायत
जिल्हा अंमलबजावणी समितीकडून आढावा
स्क्रीनिंग कमिटीकडून अंतिम मान्यता
3.तुम्हाला आगोदर अर्ज करावा लागेल अर्ज कंप्लेट झाल्या नंतर PM विश्वकर्मा ची डिजिटल id आणि प्रमान पत्र दिला जाईल.Pradhanmantri vishwakarma yojana
🛡️लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- तुमचा चालू मोबाईल नंबर
- बॅंक खाते
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जन्म प्रमाण पत्र
- जाती चे प्रमाण पत्र. इत्यादी
पायरी 1 : तुम्हाला त्याच्या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल
मुख्य पृष्टा वर गेल्यावर तुम्हाला तेथे apply now हे ऑपशन दिसेल त्या वर क्लिक करा
पायरी 2 : आधार प्रमाणिकरण करा
तुमच्या आधार कार्ड च्या साहाय्याने प्रामाणिकरण करणे महत्वाचे आहे
Otp पाठवला जाईल त्या otp च्या साहाय्याने संपूर्ण प्रक्रिया करून घ्या
पायरी 3 : फॉर्म भरणे सुरु करा
आधार ची पडताळणी झाल्या नंतर तुमच्या समोर अर्जाचा फॉर्म ओपन होईल त्या फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.
नाव : जे आधार कार्ड वर आहे तेच
वडील किंवा पती चे नाव
जन्म तारीख
तुमचे लिंग
तुमचा चालू मोबाईल नंबर
तुमचा वर्तमान पत्ता
तुमचे काय व्यवसाय आहे ते
कामाचा अनुभव
शैक्षणिक पात्रता
बॅंक खात्या चे वर्णन
पायरी 4 : फॉर्म सबमिट करा
तुमची संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला submit हे ऑपशन दिसेल त्या ऑपशन वर क्लीक करा
त्यांनतर एक संख्या तयार होईल ते संख्या सांभाळून ठेवा