प्रतिनिधी, मुंबई – दि. 13 एप्रिल 2026
Maharashtra Employees staff salary hike: राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दि. सुधारित आश्वासित प्रगती योजना (ACP Scheme) लागू करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
🗓️ 01 जानेवारी 2024 पासून योजना लागू. Maharashtra Employees staff salary hike
या शासन निर्णयानुसार,
राज्यातील खाजगी संस्था अंतर्गत मान्यताप्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि. 01.01.2024 पासून लागू करण्यात आलेली आहे.
👉 यामुळे दीर्घकाळ एकाच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व पदोन्नतीसारखा लाभ मिळणार आहे.
👨💼 कोणत्या पदांना मिळणार लाभ?
सदर सुधारित योजनेचा दुसरा लाभ (2nd ACP Benefit) खालील पदांसाठी लागू करण्यात आला आहे:
- अधिक्षक
- ग्रंथपाल
- मुख्य लिपिक
- वरिष्ठ लिपिक
- कनिष्ठ लिपिक
- प्रयोगशाळा परिचर
- नाईक
- शिपाई
💰 सुधारित वेतनश्रेणी (तक्ता)
| पद | विद्यमान वेतनश्रेणी | सुधारित वेतनश्रेणी (दुसरा लाभ) |
|---|---|---|
| अधिक्षक | Level 6 | Level 7 |
| ग्रंथपाल | Level 6 | Level 7 |
| मुख्य लिपिक | Level 5 | Level 6 |
| वरिष्ठ लिपिक | Level 4 | Level 5 |
| कनिष्ठ लिपिक | Level 2 | Level 4 |
| प्रयोगशाळा परिचर | Level 1 | Level 2 |
| नाईक | Level 1 | Level 2 |
| शिपाई | Level 1 | Level 2 |
📌 निर्णयाचे महत्व
- कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सेवेला न्याय
- आर्थिक स्थितीत सुधारणा
- मनोबल वाढविण्यास मदत
- पदोन्नती न मिळाल्यास पर्यायी लाभ.

⚠️ महत्वाची सूचना. Education Department GR 2026
- लाभ मिळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधी व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- संबंधित शाळा व्यवस्थापन व शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी प्रक्रिया राबवली जाईल.
सुधारित आश्वासित प्रगती योजना हा निर्णय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे अनेक वर्षे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना आता आर्थिक आणि पदसंबंधित लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Maharashtra Employees staff salary hike
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




