फोन लागत नाही? फक्त WhatsApp वर मेसेज करून करा गॅस सिलेंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत. LPG Gas Booking Tricks

फोन लागत नाही? फक्त WhatsApp वर मेसेज करून करा गॅस सिलेंडर बुकिंग, जाणून घ्या सोपी पद्धत. LPG Gas Booking Tricks

LPG Gas Booking Tricks : नमस्कार मित्रानो सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन बाजारात मोठे बदल होत आहेत. विशेषतः इराण आणि इस्राईल यांच्यातील तणावामुळे त्याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत आहे. देशात गॅस पुरवठा मर्यादित होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने अनेक ठिकाणी ग्राहक गॅस सिलेंडरसाठी वितरण केंद्रांबाहेर रांगा लावताना दिसत आहेत.

दरम्यान, सरकारनेही गॅस सिलेंडर बुकिंगबाबत काही मर्यादा लागू केल्या आहेत. नव्या नियमांनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनी आणि शहरी भागातील ग्राहकांना 25 दिवसांनीच गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. त्यामुळे अनेक ग्राहक चिंतेत असून बुकिंग क्रमांकावर फोन केल्यानंतरही कॉल लागत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

हे ही वाचा 👇🏻  रेल्वेचा मोठा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि स्वस्त प्रवास. Seniors Railway new scheme 

अशा परिस्थितीत ग्राहकांसाठी एक सोपी आणि जलद पद्धत उपलब्ध आहे. आता फोन कॉल न करता तुम्ही थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही गॅस सिलेंडर बुक करू शकता.


WhatsApp वरून गॅस सिलेंडर बुकिंग कसे कराल?

ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी अनेक गॅस कंपन्यांनी व्हॉट्सअॅपद्वारे सिलेंडर बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. यासाठी संबंधित कंपनीच्या अधिकृत मोबाईल नंबरवर साधा मेसेज पाठवला तरी काही सेकंदांत बुकिंग पूर्ण होते.

जर तुम्ही HP Gas चे ग्राहक असाल तर
9222201122 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज पाठवा.

जर तुम्ही Bharat Gas चे ग्राहक असाल तर
1800224344 या नंबरवर Hi किंवा Book असा मेसेज पाठवून सिलेंडर बुक करू शकता.

हे ही वाचा 👇🏻  जिल्हा परिषद निवडणूक 2026 : 7 फेब्रुवारीला या कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मिळणार. Zilla Parishad Election

जर तुम्ही Indane Gas चे ग्राहक असाल तर
7588888824 या नंबरवर REFILL असा मेसेज पाठवा.

ही सुविधा वापरल्यास फोन कॉलची अडचण टाळता येते आणि काही सेकंदांत गॅस सिलेंडर बुकिंग प्रक्रिया पूर्ण होते.


गॅस वेळेवर मिळाला नाही तर काय कराल? LPG Gas Booking Tricks

अनेक वेळा सिलेंडर बुकिंग केल्यानंतरही वेळेवर गॅस मिळत नाही. अशा वेळी ग्राहकांनी थेट गॅस कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात.

Bharat Gas ग्राहकांसाठी :
➡ 1800-22-4344

HP Gas ग्राहकांसाठी :
➡ 1800-2333-555

Indane Gas ग्राहकांसाठी :
➡ 1800-2333-555

या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची समस्या कंपनीला सांगू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर कंपनीकडून ग्राहकांना एक रेफरन्स नंबर दिला जातो. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती तपासू शकता तसेच गॅस वितरणाबाबतची माहिती मिळवू शकता.

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरु, पगारवाढ कधी सुरू होईल? पहा. 8th pay website

ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. LPG Gas Booking Tricks

जर बुकिंग क्रमांकावर फोन लागत नसेल किंवा कॉल सतत व्यस्त असेल तर काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅप बुकिंग सुविधा वापरल्यास तुम्ही घरबसल्या काही सेकंदांत गॅस सिलेंडर बुक करू शकता. त्यामुळे वेळही वाचतो आणि वितरण केंद्रावर रांगेत उभे राहण्याची गरजही राहत नाही.

Leave a Comment