नवी दिल्ली / मुंबई : Compassionate Appointment GR : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी अनुकंपा नियुक्ती संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या सुधारित योजनेमुळे राज्यातील खाजगी, अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे ही वाचा 👇🏻
आठव्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत, हे नियम नवीन वर्ष २०२६ मध्ये बदलतील. NEW RULES IN 2026
अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार नाही, नियम केले स्पष्ट. Employees gratuity news 2026
ही 5 कामे लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
सुधारित योजनेची व्याप्ती आणि लागू शाळा. Compassionate Appointment GR
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीचे सुधारित धोरण लागू राहणार आहे. मात्र, स्वयं-अर्थसहाय्यित तत्त्वावर स्थापन झालेल्या तसेच विनाअनुदानित शाळांना ही योजना लागू राहणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
यामुळे अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार असून, याआधी असलेल्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.
योजना कोणास लागू? प्राधान्यक्रम आणि वयोमर्यादा. Compassionate Appointment GR
ही सुधारित योजना मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लागू राहणार आहे. अनुकंपा नियुक्तीसाठी खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे — प्रथम पती किंवा पत्नी, त्यानंतर अविवाहित मुलगा किंवा मुलगी, मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी, घटस्फोटीत मुलगी, तसेच दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर त्याची सून. दिवंगत अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेला भाऊ किंवा बहीण यांचा समावेश करण्यात आला आहे. Compassionate Appointment GR
अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करताना संबंधित कुटुंबीयाचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 45 वर्षे असणे आवश्यक राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली असून, संबंधितांनी अधिकृत GR पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




