EPS-95 पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी, किमान पेन्शन वाढणार? EPFO News Update.
नवी दिल्ली : EPFO News Update : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओअंतर्गत EPS-95 योजनेतून पेन्शन घेणाऱ्या लाखो नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किमान पेन्शन वाढीच्या मागणीवर आता केंद्र सरकारकडून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
किमान पेन्शन वाढीची मागणी आणि सरकारची भूमिका
सध्या EPS-95 अंतर्गत किमान पेन्शन फक्त 1,000 रुपये आहे. 2014 पासून या पेन्शनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. वाढती महागाई, औषधांचे वाढलेले दर, घरभाडे आणि दैनंदिन खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे किमान पेन्शन 7,500 ते 9,000 रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी पेन्शनधारक आणि कामगार संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
हे ही वाचा 👇🏻
आठव्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत, हे नियम नवीन वर्ष २०२६ मध्ये बदलतील. NEW RULES IN 2026
अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार नाही, नियम केले स्पष्ट. Employees gratuity news 2026
ही 5 कामे लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
दरम्यान, केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरात सध्या किमान पेन्शन वाढीचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र 2014 पासून पेन्शनमध्ये वाढ न झाल्याने आगामी अर्थसंकल्पात हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
PF वेतनमर्यादा वाढ आणि संभाव्य दिलासा. EPFO News Update.
सध्या पीएफसाठी असलेली वेतनमर्यादा 15,000 रुपये आहे. ती 21,000 किंवा 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याच्या चर्चा आहेत. ही मर्यादा वाढवण्यात आल्यास त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबरोबरच त्यांच्या पेन्शनवरही होणार आहे.
काही अहवालांनुसार सरकार EPS-95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून थेट 2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा पर्याय तपासत आहे. असा निर्णय झाल्यास लाखो पेन्शनधारकांना दरमहा सुमारे 1,500 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो.
संसदीय आकडेवारीनुसार 31 मार्च 2025 पर्यंत देशात सुमारे 81.48 लाख नागरिक EPS-95 अंतर्गत पेन्शन घेत आहेत. यापैकी सुमारे 49.15 लाख पेन्शनधारकांना दरमहा 1,500 रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळते, तर केवळ 53,541 पेन्शनधारकांना 6,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते. त्यामुळे किमान पेन्शन वाढ ही केवळ मागणी नसून काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. EPFO News Update.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




