मुंबई : Maharashtra Cabinet News Today : दि. 17.01.2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांचा थेट फायदा शेतकरी, बेरोजगार युवक, पोलीस कर्मचारी, सरकारी अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.
राज्य प्रशासन, कर्मचारी व पायाभूत सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय.
अर्थ व संचालनालयाच्या अधिनस्त 1,901 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देऊन संचालनालयाचे नाव अर्थज्ञ व सांख्यिकी आयुक्तालय असे करण्यात आले आहे. मुंबईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 45 हजार शासकीय निवासस्थाने बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही वाचा 👇🏻
आठव्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत, हे नियम नवीन वर्ष २०२६ मध्ये बदलतील. NEW RULES IN 2026
अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार नाही, नियम केले स्पष्ट. Employees gratuity news 2026
ही 5 कामे लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
यासोबतच अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-02) साठी सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
शेतकरी, युवक रोजगार व धार्मिक संस्थांसाठी निर्णय. Maharashtra Cabinet News Today
शेतकऱ्यांच्या भाजीपाला निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यातील बापरगाव येथे मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशीलता व क्षमता संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल येथे भूखंड, यवतमाळ बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांची मंजुरी, पुणे परिवहन महामंडळासाठी 1,000 ई-बस, तसेच उलवे येथील पद्मावती देवी मंदिरासाठी भूखंड शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra Cabinet News Today
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




