मुंबई: 8 डिसेंबर 2025
Traffic fine settlement Maharashtra : 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये महाराष्ट्रातील ई-चलन सेटलमेंटचे कोणतेही केस स्वीकारले जाणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती राज्य वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अशी अफवा पसरली होती की लोकअदालतमध्ये ई-चलनवर सवलत किंवा रक्कम कमी करून सेटलमेंट केले जाणार आहे. अनेक यूट्यूब व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रील्समुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
मात्र, वाहतूक पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अशा कोणत्याही प्रकारची सवलत किंवा विशेष मोहिम सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये.
🚨 पोलिसांची नागरिकांना सूचना
ई-चलनाचा भरणा फक्त अधिकृत पोर्टलवरूनच करावा.
अनोळखी लिंक, सोशल मीडिया अकाउंट किंवा तृतीय पक्षाकडून पेमेंट करू नये.
कोणत्या प्रकरणांना लोकअदालतमध्ये सुनावणी मिळेल याची माहिती हवी असल्यास संबंधित न्यायालय किंवा स्थानिक ट्रॅफिक विभागाशी संपर्क साधावा.
वाहतूक विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट करत सांगितले की, 13 डिसेंबरच्या लोकअदालतमध्ये ई-चलन सेटलमेंट स्वीकारले जाणार नाही, आणि नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ किंवा मेसेजपासून सावध राहावे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
