सत्कार प्रेमाचा“: तळेगाव आगारातील वाहतूक नियंत्रक प्रमोद नखाते यांचा पाटोदा आगारात सन्मान
पाटोदा, दि. २० जुलै 2025, प्रतिनिधी
कामगारांचे हित जोपासणाऱ्या कामगार नेते, मा. आ जयप्रकाशजी छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेतर्फे, तळेगाव आगारातील वाहतूक नियंत्रक श्री. प्रमोद नखाते यांचा पाटोदा आगारात “सत्कार प्रेमाचा” या विशेष कार्यक्रमाअंतर्गत सन्मान करण्यात आला.
हा सत्कार कामगार नेते मा. आ. जयप्रकाशजी छाजेड एस टी वर्कर्स काँग्रेस संघटना आणि एस टी कामगार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला होता. आगाराच्या प्रांगणात आयोजित या छोटेखानी पण आत्मीयतेने भरलेल्या कार्यक्रमात अनेक कामगार , कर्मचारी, आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नखाते यांचा पुष्पगुछ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या शांत, शिस्तबद्ध आणि सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या कार्यशैलीची उपस्थितांनी मुक्तकंठाने स्तुती केली. त्यांनी तळेगाव आगारात वाहतूक व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केले असून, एकाच संघटनेमध्ये 20 वर्ष काम करून सुद्धा संघटनावाद न मानता कर्मचारी हितासाठीही अनेक प्रयत्न केले आहेत, हे यावेळी बोलताना स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते “सत्कार प्रेमाचा” हे दिलखेचक शीर्षक, ज्यामुळे हा एक औपचारिक कार्यक्रम न राहता, एक भावनिक आणि कृतज्ञतेने भारलेला क्षण बनला.
या वेळी संघटनेचे विभागीय सचिव श्री श्रीकांत येडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
> “आपल्याला नुसते हक्क मिळवायचे नाहीत, तर चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करत पुढे जायचे आहे. नखाते सरांसारखे कर्मचारी हे कामगारांसाठी प्रेरणा आहेत.”-
कार्यक्रमाच्या शेवटी नखाते यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की,
“हा सन्मान माझ्यासाठी एक मोठं प्रोत्साहन आहे. मी माझ्या जबाबदाऱ्या अधिक निष्ठेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहे.” -: श्री नखाते
यावेळी आगारातील शिंदे साहेब आणि त्यांचे कर्मचारी चालक, वाहक, सहित संपूर्ण एस टी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते