ब्रेकिंग न्यूज | राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 08 मोठे शासन निर्णय जाहीर. Maharashtra Government GR

मुंबई | दि. 17 मार्च 2026

Maharashtra Government GR : राज्य शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज एकाच दिवशी 08 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांचा परिणाम विविध विभागांतील हजारो कर्मचाऱ्यांवर होणार असून प्रशासनिक कामकाजाला गती मिळणार आहे.


👉 काय आहेत हे 08 महत्त्वाचे निर्णय? Maharashtra Government GR

🔹 01. महिला व बाल विकास विभागातील पदांना मुदतवाढ
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातील वर्ग 03 व 04 मधील 136 अस्थायी पदांना 01 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  महाराष्ट्र सरकार सार्वजनिक सुरक्षा विधेयक' सादर करेल, या कायद्यात विशेष काय असेल, याची आवश्यकता का आहे?Maharashtra government update 

🔹 02. सेवापुस्तकांची ऑफलाईन पडताळणी
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची प्रत्यक्ष (ऑफलाईन) पडताळणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


🔹 03. शिक्षण विभागाकडून निधी वाटप
शालेय शिक्षण विभागामार्फत विविध लेखाशिर्षांखाली निधी वाटपास मंजुरी देण्यात आली असून, हा निधी BIMS प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.


🔹 04. घरबांधणी अग्रिम मंजूर
विधी व न्याय विभागातील कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम (Loan) देण्यासाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. Maharashtra Government GR


🔹 05. पदोन्नतीचा मार्ग मोकळा
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून विद्युत निरीक्षणालयातील कर्मचाऱ्यांना
👉 गट ‘क’ मधून गट ‘ब’ (राजपत्रित) पदावर पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही वाचा 👇🏻  EPF व्याजदर अपडेट: होळीपूर्वी मोठा निर्णय शक्य, 2 मार्चला CBT बैठकीत होणार अंतिम निर्णय. EPFO Latest Update Today

🔹 06. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय
अनुदानित कला संस्थांना वेतनेतर सहाय्यक अनुदानाचे तिसरे व चौथे हप्ते वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


🔹 07. राज्य अन्न आयोगातील पदांना मुदतवाढ
मुंबई येथील राज्य अन्न आयोग कार्यालयातील अस्थायी पदांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


🔹 08. शिक्षक व शिक्षकेत्तर पदभरतीला हिरवा कंदील
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील 100% रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


📌 महत्वाची बाब. Maharashtra Government GR

या सर्व निर्णयांमुळे राज्यातील पदोन्नती, भरती प्रक्रिया, निधी वितरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधा यामध्ये मोठी सुधारणा होणार आहे. विशेषतः शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.

Leave a Comment