भारतातील पहिलं राज्य जिथे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. Social Media Ban
Social Media Ban : सोशल मीडियामुळे आज जग अधिक जवळ आले आहे. घरबसल्या जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती सहज मिळते आणि लोकांशी संपर्क साधणेही सोपे झाले आहे. मात्र सोशल मीडियाचे काही दुष्परिणामही आता स्पष्टपणे समोर येऊ लागले आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढत असून त्यातून अनेक गैरप्रकार घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर एका राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. असा निर्णय घेणारे हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही मोठी घोषणा केली. राज्य सरकार 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा कायदा करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अल्पवयीन मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचे वाढते व्यसन ही गंभीर समस्या बनत असल्याचे सरकारने सांगितले. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर, शिक्षणावर आणि सामाजिक जीवनावर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे सरकारचे मत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यभरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही तज्ज्ञांनी या बंदीची अंमलबजावणी कशी केली जाणार याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. Social Media Ban
आता ही बंदी नेमकी कशी लागू केली जाईल, सोशल मीडिया कंपन्यांवर कोणते नियम लागू होतील आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




