जुने रेशन कार्ड बंद होणार, QR कोडचे डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड मिळणार. Ration Card Update

मुंबई :   Ration Card Update : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा व्यवस्थेत मोठा बदल होणार असून महाराष्ट्र शासनाने QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सुमारे ४८ कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पामुळे रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना या नव्या स्मार्ट शिधापत्रिका देण्यात येणार आहेत. सध्या वापरात असलेल्या कागदी शिधापत्रिका काही वर्षांत खराब होतात, फाटतात किंवा हरवतात. तसेच बनावट शिधापत्रिका तयार करून गैरवापर केल्याच्या तक्रारी वाढल्याने शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेत हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा 👇🏻  पती च्या मालमत्ते मध्ये पत्नी च्या अधिकारा बाबत मोठी बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Wife Property new update

QR कोडमुळे तत्काळ पडताळणी. Ration Card Update

नवीन स्मार्ट शिधापत्रिकांवर QR कोड असणार आहे. रेशन दुकानात कार्ड स्कॅन करताच लाभार्थ्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना मिळणारा लाभ रोखता येईल आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. तक्रारींमध्ये घट होऊन वेळेचीही बचत होणार आहे.

बैठकीत मंजुरी

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनेही या प्रकल्पास हिरवा कंदील दिल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला.

ई-निविदेद्वारे अंमलबजावणी. Ration Card Update

स्मार्ट शिधापत्रिका तयार करणे आणि वितरणासाठी महाऑनलाईन ई-निविदा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता राखली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

हे ही वाचा 👇🏻  EPFO चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना दिलासा. Epfo big Decision

राज्यातील लाखो लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार असून अन्न सुरक्षा योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment