Wed. Feb 11th, 2026

    पाटोदा आगारात कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्ष, सचिव बिनविरोध!

    पाटोदा | प्रतिनिधी आर. आर.शेख 

    पाटोदा आगारातील मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून बीड  विभागीय सहसचिवपदी बिनविरोध श्री श्रीकांत येडे साहेब तर पाटोदा आगार अध्यक्षपदी विष्णू बांगर यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी चौधरी साहेब, सहसचिवपदी रामभाऊ गायकवाड यांची निवड झाली असून मिडीया प्रमुखपदासाठी शेख रसूल, नितीन गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 

    विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चातुर साहेब यांनी या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. यावेळी विभागीय सहसचिव विजय फूडके, बीड आगार अध्यक्ष राजू पवार तसेच सचिन लोंढे, मंचक आरसूळ, उपस्थित होते. गतवर्षीची कार्यकारिणी मधील बाळासाहेब दहिफळे, गणेश रसाळ, गहिनीनाथ मिसाळ यासोबतच, कार्यक्रमाला मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे सभासद आणि एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. सूत्रसंचलन रमेश राख आणि महेश लोंढे यांनी केले 

    हे ही वाचा 👇🏻  रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express

    यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे करत संघटनेची ताकद वाढविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण केली.

    नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून आगारातील कामगारांच्या समस्या सोडविण्यास गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

    By Irfan Shaikh ✅

    नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *