Retirement Age Reduction News : राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी कमी करण्याबाबत राज्य शासनाने महत्त्वाचा शासन निर्णय (GR) 17 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टता आली आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मान्यता
राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार, कृषी व पदुम विभागाच्या दिनांक 20.02.2024 च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय संवर्गासाठी विहीत करण्यात आलेले सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे हे यापुढेही कायम ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम केलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा
राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमधील काही शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतरही मा. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आपली कर्तव्ये बजावली होती. अशा याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीचे वेतन संबंधित विद्यापीठांनी अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. Retirement Age Reduction News
वेतन, रजा व वार्षिक वेतनवाढीबाबत निर्णय
शासन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील बाबी लागू राहतील —
- संबंधित कर्मचारी 60 वर्षे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत, असे समजण्यात येईल
- वाढीव कालावधीत प्रत्यक्ष काम केले असल्यास त्या कालावधीचे वेतन देय राहील
- कर्मचाऱ्यांच्या खात्यात अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास, त्या रजेचे लाभ देण्यात येतील
- या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही
- त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम, 1981 मधील वित्त विभागाच्या तरतुदी लागू राहतील

कर्मचाऱ्यांसाठी स्पष्टता निर्माण करणारा निर्णय
हा शासन निर्णय कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला असून, सेवानिवृत्ती व त्यानंतरच्या वेतन व सेवा लाभांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. Retirement Age Reduction News
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




