थकीत वेतन देयके अदा करण्याबाबत 21 जानेवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी. Pending Salary Payment Circular
Pending Salary Payment Circular : राज्यातील शालेय कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन देयकांबाबत शासनाने दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकानुसार थकीत वेतन देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीद्वारे सादर करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
शालार्थ प्रणालीतून थकीत वेतन सादर करण्याचे निर्देश
शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार, सन 2024-25 पासून सर्व थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
डी.डी.ओ. व मुख्याध्यापकांसाठी दिलेली अंतिम मुदत
सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीत सादर करण्यासाठी
DDO-01 (मुख्याध्यापक – शाळा स्तर) यांना दिनांक 10 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
जिल्हानिहाय थकीत देयकांची पडताळणी
दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी उपलब्ध असलेल्या ऑनलाईन माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यातील थकीत देयके अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.
या देयकांची दिनांक 02 फेब्रुवारी 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने पडताळणी करून, ती ऑनलाईन पद्धतीने पुढे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाची सूचना : थकीत देयके स्वीकारली जाणार नाहीत
परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की — Pending Salary Payment Circular
- सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके यानंतर मान्यतेसाठी स्वीकारली जाणार नाहीत.
- विलंबामुळे थकीत वेतन अदा होण्यास अडचण निर्माण झाल्यास,
- त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आस्थापन प्रमुखांवर राहणार आहे.
कर्मचारी व प्रशासनासाठी महत्त्वाचा इशारा
या परिपत्रकामुळे शाळा प्रशासन, मुख्याध्यापक व DDO यांनी तातडीने थकीत वेतन प्रकरणांची पूर्तता करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. Pending Salary Payment Circular
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




