FD पेक्षा जास्त परतावा देणारी पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, Post Office Scheme January

Created by irfan :- 27 January 2026

Post Office Scheme January : गेल्या काही महिन्यांमध्ये पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाने मागील वर्षी रेपो रेटमध्ये तब्बल 1.25 टक्क्यांची कपात केली.

रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर देशभरातील सरकारी तसेच खासगी बँकांनी फिक्स डिपॉझिट (FD) चे व्याजदर कमी केले. याचा थेट फटका FD गुंतवणूकदारांना बसला असून सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायांचा शोध नागरिकांकडून घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

हे ही वाचा :- 👉 ईपीएफओची मोठी तयारी, पीएफ खातेधारकांसाठी खूप काही बदलणार आहे 👈

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (MIS) ठरतेय फायदेशीर

पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) ही सध्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दर महिन्याला निश्चित व्याज मिळते.

हे ही वाचा 👇🏻  या पेन्शन धारकांची पेन्शन बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Life certificate update January

या योजनेत सिंगल आणि जॉईंट अकाउंट उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • सिंगल अकाउंटमध्ये कमाल 9 लाख रुपये गुंतवता येतात
  • जॉईंट अकाउंटमध्ये कमाल 15 लाख रुपये गुंतवणूक करता येते

दरमहा 9,250 रुपये, वार्षिक 1.11 लाखांचे व्याज

जर तुम्ही पत्नी, आई किंवा कुटुंबातील इतर सदस्यासोबत जॉईंट अकाउंटद्वारे 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला दरवर्षी सुमारे 1 लाख 11 हजार रुपयांचे व्याज मिळते. म्हणजेच दरमहा जवळपास 9,250 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.

हे ही वाचा :- 👉 या 5 चुकांमुळे तुमची घर-जमीन थेट सरकार जमा होऊ शकते, जाणून घ्या कायदा काय सांगतो.👈

योजनेचा कालावधी आणि इतर फायदे

या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

  • दर महिन्याला व्याज थेट बँक खात्यात जमा
  • मुदत पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण गुंतवणूक रक्कम परत
  • सरकारी योजना असल्यामुळे सुरक्षिततेची हमी
हे ही वाचा 👇🏻  UPI चालणार नाही, सेवा या दिवशी बंद राहील- बँकेने सांगितली तारीख आणि वेळ. UPI downtime alert

कोणासाठी फायदेशीर? Post Office Scheme

निवृत्त कर्मचारी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक किंवा नियमित मासिक उत्पन्न हवे असलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते.

FD पेक्षा जास्त आणि निश्चित परतावा हवा असेल, तर पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Leave a Comment