Salary Account Benefits : सॅलरी खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्या कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना चक्क 2 कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व लाभ थेट सॅलरी खात्यावरच उपलब्ध होणार आहेत.
आतापर्यंत कर्मचाऱ्यांना वैयक्तिक अपघात विमा, आरोग्य विमा, टर्म लाईफ विमा यांसाठी वेगवेगळ्या कंपन्या किंवा बँकांमध्ये धावपळ करावी लागत होती. मात्र आता या नव्या योजनेमुळे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे विमा संरक्षण आणि बँकिंग सुविधा मिळणार आहेत.
📌 या नव्या सॅलरी अकाउंट प्लॅनमधील प्रमुख सुविधा. Salary Account Benefits
या नविन प्लॅननुसार सॅलरी खातेधारकांना खालीलप्रमाणे अनेक सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत :
- 🔹 झिरो बॅलन्स सॅलरी खाते
- 🔹 UPI, RTGS, NEFT सुविधा पूर्णपणे मोफत
- 🔹 मोफत चेकबुक व ATM/डेबिट कार्ड
- 🔹 शिक्षण कर्ज, होम लोन व पर्सनल लोनवर कमी व्याजदर
- 🔹 कर्ज प्रक्रिया शुल्कामध्ये सवलत
- 🔹 लॉकर भाड्यामध्ये विशेष सूट
- 🔹 कुटुंबीयांसाठीही अतिरिक्त बँकिंग फायदे
- 🛡️ विमा संरक्षणाचा तपशील
- या कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेजमध्ये
खालीलप्रमाणे विमा संरक्षण दिले जाणार आहे :
- ✔️ वैयक्तिक अपघात विमा – 1.50 कोटी रुपये.
- ✔️ विमान अपघात विमा – 2.00 कोटी रुपये.
- ✔️ कायमस्वरूपी अपंगत्व विमा – 1.50 कोटी रुपये.
- ✔️ टर्म लाईफ इन्शुरन्स – 20 लाख रुपयांचे इन-बिल्ट कव्हर.
- ✔️ आरोग्य विमा – स्वतः व कुटुंबीयांसाठी बेस प्लॅन ते टॉप-अप पर्याय उपलब्ध.
🏦 लाभ कसा घ्यावा? Salary Account Benefits
या नविन योजनेचा लाभ घेण्यासाठी सॅलरी खातेधारकांनी आपल्या बँकेच्या शाखेला भेट देऊन कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेजची माहिती घ्यावी. बँक व सॅलरी स्लॅबनुसार विमा व इतर सुविधा थोड्याफार बदलू शकतात.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




