State Employee News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे ही 3 टक्के वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली असून, याआधी जानेवारीपासून 2 टक्के डीए वाढ देण्यात आली होती.
केंद्र कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर महागाई भत्ता वाढ मिळणार असल्याची अपेक्षा होती. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा 👇🏻
आठव्या वेतन आयोगापासून ते EPFO पर्यंत, हे नियम नवीन वर्ष २०२६ मध्ये बदलतील. NEW RULES IN 2026
अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळणार नाही, नियम केले स्पष्ट. Employees gratuity news 2026
ही 5 कामे लवकर पूर्ण करा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होईल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
खरं तर राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र शासनाने डीए वाढीचा निर्णय पुढे ढकलला. आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हा निर्णय आणखी विलंबित होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.
केव्हा वाढणार DA?. State Employee News
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. महापालिका निवडणुका 15 जानेवारी 2026 रोजी पार पडणार असून, त्याचा निकाल 16 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे 16 जानेवारीनंतर कधीही राज्य कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के डीए वाढीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
जानेवारीत GR, फेब्रुवारीत प्रत्यक्ष लाभ. State Employee News
रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर केला जाऊ शकतो. यानंतर या वाढीचा प्रत्यक्ष लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच फेब्रुवारी 2026 मध्ये मिळणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ही डीए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जुलै 2025 पासून लागू राहणार असल्याने, राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम (DA Arrears) सुद्धा मिळणार आहे.
मात्र अद्याप महागाई भत्ता वाढीचा जीआर नेमका कधी निघणार, याची अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार जानेवारी महिन्यात हा निर्णय घेते का, याकडे राज्यातील लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




