पाटोदा : दि. 15 जानेवारी 2025
ST Employees news : आज पाटोदा येथील एस.टी. आगार व बस स्थानक परिसरात सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांच्या सहभागातून व्यापक श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. प्रवासी नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित सेवा मिळावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळच्या सत्रात आगार व बस स्टॅंड परिसरातील कचरा साफसफाई, झाडू मारणे, पाण्याची साठवण टाळण्यासाठी आवश्यक उपाय, तसेच परिसर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करत स्वच्छतेबाबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेसह शिस्तबद्धतेचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या श्रमदान कार्यक्रमास आगार प्रमुख डोके साहेब, कार्यशाळा अधीक्षक शिंदे साहेब, स्थानक प्रमुख खेडकर साहेब, हेड मेकॅनिक येडे साहेब, टी.आय. राठोड साहेब तसेच कंट्रोलर परजने साहेब यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
प्रवाशांच्या दृष्टीने एस.टी. बसस्थानक हे महत्त्वाचे सार्वजनिक केंद्र असून, अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पाटोदा एस.टी. आगारात राबविण्यात आलेला हा श्रमदान उपक्रम इतर ठिकाणांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.








नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




