महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : सेवाग्रही उपदान व मृत्युपदानाची कमाल मर्यादा वाढवली, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! Government Employee News, Maharashtra
Government Employee News, Maharashtra: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सेवाग्रही उपदान (Retirement Gratuity) आणि मृत्युपदान (Death Gratuity) यांची कमाल मर्यादा ₹14 लाखांवरून वाढवून ₹20 लाख करण्यात आली आहे. हा निर्णय १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार आहे.
🔹काय आहे शासनाचा निर्णय? Government Employee News, Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने १० नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या उपदानाची मर्यादा आता ₹१४ लाखांच्या ऐवजी ₹२० लाख इतकी करण्यात आली आहे.
हा निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन योजनेंतर्गत घेतलेल्या धोरणानुसार करण्यात आला आहे.
🔹 मृत्युपदानाची मर्यादाही वाढवली
सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना मिळणाऱ्या मृत्युपदानाची मर्यादा देखील याच प्रमाणे ₹१४ लाखांवरून ₹२० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
🔹 मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय. Government Employee News, Maharashtra
राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या मागण्यांचा विचार करून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.
ही बाब १ ऑक्टोबर २०२४ पासून प्रभावी होईल, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
🔹 कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ? Government Employee News, Maharashtra
- या नव्या नियमाचा फायदा खालील कर्मचाऱ्यांना होणार आहे:
- महाराष्ट्र शासनातील सर्व नियमित शासकीय अधिकारी आणि कर्मचारी.
- अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठातील कर्मचारी.
- निवृत्त किंवा मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस
🔹 कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. Government Employee News, Maharashtra
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळणार असून, त्यांचे वारसदारही सुरक्षित राहतील.
मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांकडून उपदान मर्यादा वाढविण्याची मागणी केली जात होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य करत मोठा दिलासा दिला आहे.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .



