कर्मचाऱ्यांच्या आपत्कालीन गैरहजेरीवर आता कारवाई नाही! कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची मुख्यालयाकडून दखल. MSRTC Latest Update

मुबंई :  MSRTC Latest Update  राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) चालक व वाहकांच्या रजेबाबत होत असलेल्या तक्रारींची अखेर मुख्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अचानक तब्येत बिघडणे, कुटुंबातील दुर्दैवी प्रसंग किंवा इतर आपत्कालीन कारणांमुळे नियोजित कामगिरीवर उपस्थित राहता न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची शिस्तभंग कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

राज्यातील विविध आगारांमधून, विशेषतः ग्रामीण भागातून, चालक-वाहकांना रजेच्या कारणास्तव वारंवार स्पष्टीकरण मागितले जात असल्याच्या तक्रारी मुख्यालयाकडे पोहोचल्या होत्या. काही ठिकाणी वरिष्ठांकडून कठोर भूमिका घेतली जात असल्याची नोंदही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यालयाने सर्व विभाग नियंत्रकांना लेखी आदेश काढून प्रकरणे राज्य परिवहनच्या प्रचलित नियमांनुसार हाताळावीत, असे बजावले आहे. MSRTC Latest Update

हे ही वाचा 👇🏻  महाराष्ट्रात 13 डिसेंबरच्या लोकअदालतमध्ये ई-चलन सेटलमेंट होणार नाही; वाहतूक पोलिसांचा इशारा.

यासोबतच आगार व्यवस्थापकांनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अनावश्यक दबाव टाकू नये किंवा छळ करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत न्याय्य आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यालयाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत गैरहजेरी लागल्यास थेट कारवाई होणार नाही, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. “आता तरी न्याय मिळेल,” अशी प्रतिक्रिया काही चालक-वाहकांनी दिली. MSRTC Latest Update

दरम्यान, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभागीय नियंत्रक व आगार प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. MSRTC Latest Update

Leave a Comment