TET परीक्षेतील प्रश्न रद्द झाल्याने काठावर पास शिक्षकांना वाढीव गुण; उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी वाढणार.MAHATET Question Cancelled

TET परीक्षेतील प्रश्न रद्द झाल्याने काठावर पास शिक्षकांना वाढीव गुण; उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी वाढणार. MAHATET Question Cancelled

मुंबई | प्रतिनिधी. 5 फेब्रुवारी 2026

MAHATET Question Cancelled :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परीक्षेमधील एक प्रश्न चुकीचा असल्याचे आढळून आल्याने सदर प्रश्न रद्द करण्याबाबत शुद्धीपत्रक (Corrigendum) निर्गमित करण्यात आले आहे. यामुळे अनेक काठावर असलेल्या उमेदवारांना वाढीव गुण मिळणार असून, उत्तीर्ण शिक्षकांची एकूण टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा 👇🏻  या कुटुंबांना 3 महिन्याचे राशन एकदाच मिळणार, सरकारची मोठी घोषणा. जाणून घ्या संपूर्ण माहिती. Ration card e kyc

MAHATET 2025 अंतरिम निकाल जाहीर

दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा 2025 घेण्यात आली होती.
या परीक्षेचा पेपर 1 (इयत्ता 1 ते 5) आणि पेपर 2 (इयत्ता 6 ते 8) यांचा अंतरिम निकाल परिषदच्या अधिकृत संकेतस्थळावर  रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.

हरकती व गुणपडताळणी प्रक्रिया. MAHATET Question Cancelled

अंतरिम निकालानंतर उमेदवारांकडून दि. 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत गुणपडताळणी व हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकतींच्या आधारे काही प्रश्नांबाबत तज्ज्ञ व समिक्षकांकडून पुनर्तपासणी करण्यात आली.

हे ही वाचा 👇🏻  आता बँका, रेल्वे आणि केंद्राच्या सर्व कार्यालयात मराठी अनिवार्य, महाराष्ट्र सरकारचे शासन निर्णय जारी . Maharashtra Government News

पेपर 1 मधील प्रश्न रद्द

तपासणीअंती पेपर 1 (परिसर अभ्यास विषय) मधील खालील प्रश्नांबाबत आक्षेप मान्य करण्यात आले आहेत —

  • संच A : प्रश्न क्रमांक 147
  • संच B : प्रश्न क्रमांक 142
  • संच C : प्रश्न क्रमांक 137
  • संच D : प्रश्न क्रमांक 132

तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार हा प्रश्न चुकीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर प्रश्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. MAHATET Question Cancelled

काठावरच्या उमेदवारांना दिलासा

प्रश्न रद्द झाल्यामुळे संबंधित सर्व उमेदवारांना नियमानुसार गुण देण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक उमेदवार जे अगदी थोड्या गुणांनी अपात्र ठरत होते, ते आता उत्तीर्ण ठरण्याची दाट शक्यता आहे. परिणामी MAHATET 2025 ची एकूण उत्तीर्ण टक्केवारी वाढणार आहे.

हे ही वाचा 👇🏻  ITR दाखल करण्यासाठी नवीन पॅन कार्ड असणे आवश्यक आहे का. Itr filing date 

सुधारित अंतरिम निकाल जाहीर होणार

सदर निर्णयानुसार लवकरच सुधारित अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असून, सर्व परीक्षार्थी शिक्षकांनी याची नोंद घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आले आहेत.

Leave a Comment