EPFO ची मोठी घोषणा! ‘Employees Enrolment Campaign 2025’ सुरू – जुन्या कर्मचाऱ्यांना PF मध्ये सामील होण्याची मोठी संधी
नवी दिल्ली | ४ नोव्हेंबर २०२५
Employees Enrolment Campaign : नमस्कार मित्रानो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून कर्मचाऱ्यांसाठी आणि नियोक्त्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘Employees Enrolment Campaign 2025’ या नावाने नवीन योजना सुरू करण्यात आली असून, तिचा उद्देश आहे – ज्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत पीएफ (Provident Fund) योजनेत सामील केले गेले नाही, त्यांना आता अधिकृतपणे या योजनेचा लाभ मिळवून देणे.
ही योजना १ नोव्हेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत देशभरात लागू राहणार आहे.
📌 योजनेचा उद्देश.
EPFO च्या या विशेष मोहिमेचा मुख्य हेतू म्हणजे कामगारांना सामाजिक सुरक्षा कवचात आणणे. अनेक वेळा काही नियोक्ते कर्मचाऱ्यांना PF अंतर्गत नोंदवित नाहीत. त्यामुळे त्यांना निवृत्ती नंतरच्या लाभांपासून वंचित राहावे लागते.
या नव्या मोहिमेतून सरकारने त्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि नियोक्त्यांना पुन्हा एक संधी दिली आहे की त्यांनी नियमित PF नियमांचे पालन करून सर्व कामगारांना या योजनेत समाविष्ट करावे.
👷♂️ कोण पात्र आहे?
EPFO नुसार,
ज्यांनी १ जुलै २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान काम सुरू केले आहे, पण PF अंतर्गत समाविष्ट झाले नाहीत — ते या योजनेत सहभागी होऊ शकतात.
नियोक्त्याने ज्या दिवशी घोषणा करावी तेव्हा तो कर्मचारी सदर नियोक्त्याकडे कामावर असावा आणि जीवित असावा.
नियोक्ता कोणत्याही प्रकारच्या उद्योगातून असू शकतो — नवीन किंवा जुना, दोघांनाही सहभागाची परवानगी आहे.
💰 मिळणारे फायदे.
या योजनेत सहभागी झाल्यास नियोक्त्यांना मोठे आर्थिक फायदे मिळणार आहेत.
कर्मचारी भाग माफ: कर्मचाऱ्यांचा PF योगदानाचा भाग जर पगारातून कधी कट झाला नसेल, तर तो पूर्णपणे माफ होईल.
नियोक्त्याला फक्त आपला भाग भरावा लागेल, त्यासह व्याज आणि प्रशासकीय शुल्क.
दंड फक्त ₹100! या योजनेत सहभागी होणाऱ्या नियोक्त्यांना प्रतीकात्मक स्वरूपात फक्त १०० रुपये दंड आकारला जाणार आहे.
पूर्वीचे सर्व उल्लंघन (non-compliance) सुधारणे सोपे होईल.
🧾 अर्ज प्रक्रिया.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियोक्त्यांना खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:
1. EPFO च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन घोषणा (declaration) सादर करणे.
2. ज्यांना PF अंतर्गत आणायचे आहे त्या कर्मचाऱ्यांचे तपशील अपलोड करणे.
3. UAN (Universal Account Number) तयार करणे.
4. नंतर ECR – Electronic Challan cum Return भरून आवश्यक शुल्क जमा करणे.
कोणाला या योजनेचा लाभ नाही?
जे कर्मचारी १ जुलै २०१७ पूर्वी नोकरीत रुजू झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर नियोक्त्याने चुकीची माहिती दिली किंवा माहिती लपवली, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि घोषणेला अमान्य ठरवले जाईल.
सरकारचा उद्देश
सरकारचा उद्देश स्पष्ट आहे — देशातील प्रत्येक कामगाराला सामाजिक सुरक्षा कवचात आणणे. EPFO च्या माध्यमातून लाखो कर्मचाऱ्यांना निवृत्ती, विमा आणि पेन्शनचे फायदे मिळतात.
या मोहिमेमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार आता औपचारिक क्षेत्रात (Formal Sector) येतील आणि त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
